पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
४४
 

पण आपण रक्ताने श्रेष्ठ आहो, श्रेष्ठवंशीय आहो, अशी एक भावना, काही कारणाने, त्यांच्या ठायी निर्माण झाली. तिचे वर्णन करून प्रसिद्ध इतिहासपंडित एच. ए. एल. फिशर म्हणतो की या अस्मितेच्या जाणिवेमुळेच ग्रीकांच्या ठायी कर्तृत्वाचा उदय झाला (हिस्टरी ऑफ युरोप, पृ. १५) हाच प्रकार सर्वत्र होत असतो आणि म्हणूनच ही श्रेष्ठतेची जाणीव, हा अभिमान, हेच पृथगात्मतेचे खरे लक्षण होय, असे वर म्हटले आहे. हे लक्षण महाराष्ट्रीयांच्या ठायी कितपत होते, त्यांना स्वदेश, स्वभाषा व स्वसमाज यांचा अभिमान कितपत होता ते आता पाहावयाचे आहे. त्याचबरोबर इतरांना म्हणजे महाराष्ट्रीयतरांना यांच्या भिन्नतेची वैशिष्ट्याची भिन्न संस्कृतीची जाणीव होती की नाही, कितपत होती, हेही शोधावयाचे आहे.
 मराठीच्या प्रारंभकाळीच मराठीत वाङ्मय लिहून ज्यांनी या भाषेला नामरूप प्रात करून दिले त्या महानुभावांना महाराष्ट्राचा विशेष अभिमान होता. ' महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र' हे आचारस्थळकर्ते शिववास यांचे उद्गार वर एके ठिकाणी दिलेच आहेत. महाभाष्यकर्ते विश्वनाथवास यांचेही उद्गार असेच आहेत. 'थोरा पासोनी महाथोर, तयाते महाराष्ट्र म्हणिजे. तर राष्ट्रशब्दे आणिक देश बोलिले असत की. ना ते भूमीने थोर होती, परी गुणवृद्धीने नव्हेती.' दुसऱ्या एका उत्तरकालीन महानुभाव ग्रंथात महाराष्ट्राचा असाच गौरव केलेला आढळतो. ' साठी लक्ष देश महाराष्ट्र | तेथीचे राये शिहाणे सुभटू। वेदशास्त्रचातुर्याची पेठू भरेली तिये देशी । ऐसे हे महाराष्ट्र राये सुंदरू | वरी महाराष्ट्र भाषा चतुरू तेही बसविले गंगातीरु । क्षेत्र त्र्यंबक वेऱ्ही.
 यातील महाराष्ट्र देश व महाराष्ट्र भाषा यांचा अभिमान स्पष्ट आहे. ज्ञानेश्वरांच्या काळापासून मराठी भाषेचा, महाराष्ट्रभूमीचा व येथील भागवतधर्मी लोकांचा अभिमान निःसंह रीतीने प्रगट होऊ लागला. पण आपल्याला शोध घ्यावयाचा आहे तो त्याच्या मागल्या ह्जार दीडहजार वर्षांच्या काळातला. म्हणून मांगल्याप्रमाणेच महानुभावांपासून प्रारंभ केला आहे. तेथून सातवाहन काळापर्यंत आपण जाणार आहो.

वीरपुरुषांचा देश
 दहाव्या शतकातील नलचंपू या काव्यात कवीने महाराष्ट्राची 'वीरपुरुषांचा देश' म्हणून प्रशंसा केली आहे.

वीरपुरुषं तदेतद् वरदातटनामकं महाराष्ट्रम् ।
दक्षिणसरस्वती सा वहति विदर्भा नदी यत्र ॥ नलचंपू, ६.६६

 वरदातट म्हणजे वऱ्हाड म्हणजे विदर्भ. त्यालाच कवीने महाराष्ट्र म्हटले आहे व ते वीरपुरुषांचे राष्ट्र आहे, असा त्याचा गौरव केला आहे. शिवाय विदर्भा नदीला दक्षिण सरस्वती म्हणून महाराष्ट्रीयांच्या विद्यासंपन्नतेचाही त्याने निर्देश केला आहे.
 राजशेखराचा उल्लेख वर आलाच आहे. बालरामायणात त्याने महाराष्ट्राचा ( विदर्भाचा ) 'सारस्वती जन्मभूः' असा रामाच्या तोंडून उल्लेख केला आहे. त्याला