पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३०.
खर्डा— अखेरचा विजय
 



 नारायणरावाचे खुनानंतर पेशवाई ही संपल्यातच जमा होते. १७७४ साली सवाई माधवरावाचा जन्म झाला. आणि त्याला पेशवाईची वस्त्रेही मिळाली. पण आपल्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात त्याने स्वतंत्रपणे अधिकार असा केव्हाच चालविला नाही. सर्व सत्ता नाना फडणीसच चालवीत होता. तेव्हा तेथपर्यंत पेशवाई होती या म्हणण्यात काही अर्थ नाही.

तिय्यम सत्ताधारी
 नाना फडणिसाच्या हाती सत्ता गेली तेव्हा, राज्यातील सार्वभौम सत्तेच्या दृष्टीने पाहता, तिसऱ्या दर्जाच्या पदी असलेला माणूस सत्ताधारी झाला. पहिला सत्ताधारी म्हणजे छत्रपती. तसा पुरुष शंभू छत्रपतींच्या नंतर मराठ्यांना केव्हाच मिळाला नाही. शाहू महाराजांच्या वेळी पेशवेच खरे सत्ताधारी होते. पण त्यांचे पद दुसऱ्या दर्जाचे होते. त्यामुळे खरी सार्वभौम सत्ता त्यांना कधीच मिळाली नाही. अष्टप्रधान व सरदार सरंजामदार यांना ते कधीच ताब्यात ठेवू शकले नाहीत. राज्याची जबाबदारी सगळी, पण त्यास अवश्य ती सत्ता मात्र हाती नाही, अशी पेशव्यांची स्थिती होती. आणि आता नाना तर त्या पेशव्यांचा एक फडणीस, म्हणजे कारकून ! सरदारही नव्हे. अर्थात त्याचे पद तिसऱ्या दर्जाचे होते. आणि राज्याची जबाबदारी मात्र सगळी त्याच्या शिरावर ! यामुळे मराठी राज्याची फार हानी झाली. एकमुखी निर्णायक सत्ता असणारा सत्ताधारी ज्या राज्याला नाही, त्यातल्या सर्व शक्ती एकसूत्रात कशा चालणार ? आणि त्या राज्याला बळ तरी कोठून यणार ? अशा स्थितीतही नाना