पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२१
पेशवाईचा उदय
 

मराठमंडळाची सत्ता असे मराठी राज्याला व साम्राज्याला रूप प्राप्त झाले. अर्थात या मंडळाला काही निश्चित घटना होती असे मुळीच नाही. पेशवा आपल्या कर्तबगारीने या विस्कळित प्रपंचातून जी एकसूत्रता व संघटित शक्ती निर्माण करील तेवढेच मराठी राज्याचे सामर्थ्य.
 अशा सामर्थ्यावर चालविलेला राज्यकारभार हे पेशवाईचे स्वरूप होते.