पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
२२
 

तसा मराठीत उतरला हे निश्चित. " ( यादवकालीन मराठी भाषा - पृ. १९ )
 या अपभ्रंश भाषेची पूर्वपीठिका सांगताना डॉ. तुळपुळे म्हणतात : आर्यलोक विध्याच्या दक्षिणेस इ. पू. ६०० च्या सुमारास येऊ लागले व त्यांनी गोपराष्ट्र महराष्ट्र, पांडुराष्ट्र, कोकण, विदर्भ व अदमक ही मुख्य राष्ट्र स्थापित केली. या सर्वांचे मिळून पुढे मोठे राष्ट्र झाले तेच महाराष्ट्र या महाराष्ट्रात आर्य जी भाषा तत्काली बोलत ती महाराष्ट्री प्राकृत. याचा अर्थ असा की इ. स. पूर्वी ६०० च्या मुमाराम महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व होते है निश्चित. येथील महारटी लोक त्या वेळी जी महाराष्ट्री भाषा बोलत ती संस्कृतची उ उ अपभ्रष्ट प्रतिकृती होती. या महाराष्ट्रीचाच अपभ्रंश महाराष्ट्रात इ. स. ५०० च्या सुमारास रूढ झाला; आणि या महाराष्ट्री अपभ्रंशापासूनच इ. स. १००० च्या सुमारास मराठी उत्पन्न झाली ( यादव. पृ. २४).
 याप्रमाणे मुख्य सिद्धान्ताचे प्रतिपादन करून नंतर डॉ. तुळपुळे यांनी वर्णप्रक्रिया- प्रत्ययप्रक्रिया, शब्दसिद्धी व वाक्प्रयोग या दृष्टींनी महाराष्ट्री अपभ्रंशापासून यादव- कालीन मराठी उत्पन्न झाली व उत्कान्त झाली हे निःसंदेह रीतीने सिद्ध केले आहे. ते म्हणतात, "(१) मराठीची वर्णप्रक्रिया अपभ्रंशापासूनच झालेली असून अपभ्रंशातील सर्व उच्चार तीत आढळतात. यादव मराठीतील उच्चारप्रक्रिया म्हणजे अपभ्रंशातील उच्चारपद्धतीचीच उत्क्रांत अवस्था होय. अपभ्रंशातील स्वर व व्यंजने यादव मराठीत उतरली आहेत. अपभ्रंशातील च, छ, ज, झ यांचे दंततालव्य उच्चार यादव मराठीत आले. एतत् प्रकरणी स्थाननियत स्वरप्रक्रिया, अंत्यस्वरांचे ऱ्हस्वीकरण, स्वरभक्तीचे प्राबल्य इ. १९ बाबी यादव मराठीने साक्षात अपभ्रंशापासून घेतल्या आहेत. तात्पर्य, यादव मराठीतील उच्चार अपभ्रंशातून वर्णप्रक्रियेच्या नियमांनी उतरले आहेत. ( २ ) प्रत्ययत्रक्रिया - यातील नामविभक्तीप्रकरणावरून पुढील सिद्धांत बांधता येईल. यादव मराठीत विभक्तीची प्रत्ययी व सामासिक अशी दोन्ही रूपे जोडीने आढळतात. अपभ्रंशातील प्रत्ययी विभक्ती आणि वर्तमानमराठीतील सामासिक विभक्ती यांमधील हा एक सांधणारा दुवा आहे. आख्यात विभक्तीचा विचार करता असे दिसते की यादव मराठीने अपभ्रंशाव्यतिरिक्त कोणतेही प्रत्ययी रूप स्वतंत्रपणे बनविले नाही. अपभ्रंशातील आणि यादव मराठीतील प्रत्ययी आख्यात विभक्ती समसमान आहेत. " प्रत्ययप्रक्रियेविपयी तपशील देताना डॉ. तुळपुळे यांनी मराठीत अपभ्रंशातून नामविभक्तीच्या बाबतीत १२ लकबा आल्याचे सांगून पुढे म्हटले आहे की यादव मराठीने नामांची व सर्वनामांची प्रत्ययी विभक्तीरूपे अपभ्रंशातूनच घेतली आहेत. त्याचप्रमाणे आख्यात विभक्तीच्या बाबतीत अपभ्रंशातून यादवमराठीत आलेल्या ७ बाबींचे विवरण करून त्यांनी म्हटले आहे की यादव- मराठीने क्रियापदाची प्रत्ययी रूपे व कृदन्त रूपे साक्षात अपभ्रंशापासून घेतली. संयुक्त क्रियापदे किंवा सामासिक क्रियारूपे मात्र तिने स्वतंत्रपणे बनविली आहेत.