पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
२०
 

वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, वाक्यरचना इ. भाषाशास्त्रीय पुराव्यावरून त्याची भाषा म्हणजे ज्ञानेश्वरपूर्व मराठीचे रूप आहे असे ठरते. (५) त्यातील वृत्त व मराठीतील वृत्ते ( गणवृते, मात्रावृते व आधुनिक गेयवृत्तेसुद्धा ) एकच आहेत.

देसी भासा
 प्राचार्य वि. भि. कोलते यांनी आपल्या 'मराठीचे माहेर' या लेखात 'अपभ्रंशा- पासूनच साक्षात मराठी निर्माण झाली ', हे मत अनेक प्रमाणे देऊन मांडले आहे ( विक्रमस्मृती १९४६ - ग्वाल्हेर ) 'मराठी भाषा उद्गम व विकास' या आपल्या ग्रंथात प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांनी 'मराठी अमुक एका विशिष्ट भाषेपासून निघाली असे म्हणता येत नाही' असे मत मांडले आहे. संस्कृत, महाराष्ट्री, अर्धमागधी इ. सर्व प्राकृत व अपभ्रंश यांचे सर्वांचे काही विशेष मराठीत दिसतात म्हणून अमुकच एक भाषा मराठीची जननी असे म्हणणे सयुक्तिक नाही, असे श्री. कुळकणीं म्हणतात. प्रा. कुळकर्णी याची या बाबतीतली सर्व विधाने खोडून काढून प्रा. कोलते यांनी 'अपभ्रंश' हीच मराठीची जननी हे आपले मत सिद्ध केले आहे. प्रा. कुळकर्णी यांची काही विधाने व त्याला प्रा. कोलते यांनी दिलेली उत्तरे खाली दिली आहेत, त्यांवरून श्री. कोलते यांचा सिद्धांत स्पष्ट होईल.
 प्रा. कुळकर्णी म्हणतात, 'तृण, प्रावृष, वृक्ष इ. संस्कृत शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली तिण, पाऊस, रुख ही व या प्रकारची रूपे पालीमध्ये आढळतात व तीच मराठीमध्ये आढळतात.' यावर श्री. कोलते यांचे उत्तर असे की, ' ही रूपे अपभ्रंश भाषेतही आढळतात. 'णायकुमारचरिऊ', 'करकंडचरिऊ' इ. अपभ्रंश ग्रंथात ही रूपे आहेत. शिवाय प्राकृत, अपभ्रंश या भाषांच्या अपेक्षेने पालीभाषा एकतर अत्यंत प्राचीन होय. आणि दुसरे म्हणजे ती उत्तर हिंदुस्थानच्या पूर्व भागात रूढ होती. त्यामुळे मराठीशी तिचा साक्षात संबंध येणे असंभवनीय आहे.'
 पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांत 'न 'कार नाही, तेव्हा तो मराठीने पैशाचीतून घेतला आहे, हे श्री. कुळकर्णी यांचे मतही असेच चुकीचे आहे. महाराष्ट्री प्राकृतात 'न' आहे (पहा - गौडवहो ) आणि तो अपभ्रंशातही आहे ( णायकुमार चरित-प्रस्तावना - डॉ. हिरालाल जैन ). तेव्हा तो पैशाचीवरून घेण्याची मराठीला गरज नव्हती, हे उघड आहे. अर्धमागधीमध्ये दीर्घस्वर ऱ्हस्व होणे, 'द' चा 'उ' होणे, आद्य 'न' जसाच्या तसा राहणे, मृदू व्यंजनाचे कठोर व्यंजन होणे, इ. लकबा आहेत; आणि तशाच त्या मराठीत आहेत हे खरे; पण त्या अपभ्रंशातही सापडतात. तेव्हा ते अर्धमागधीचे ऋण असे मानण्याचे कारण नाही. या सर्व प्रमाणांवरून मराठीचे जननीत्व अनेक भाषांकडे देणे अयुक्त आहे व अपभ्रंशाशीच तिचा साक्षात संबंध आहे हे डॉ. कोलते यांचे मत मान्य होईल असे वाटते.
 मराठीचे जननीत्व अपभ्रंश भाषेकडेच आहे असे सिद्ध करण्यास डॉ. कोलते यांनी