पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३८२
 

समारोप करण्याची आता गरज आहे असे वाटत नाही.

महान् लोकशिक्षक
 'श्री वेदव्यासानंतरचा महान् लोकशिक्षक' यापेक्षा समर्थांचा जास्त गौरव काही असू शकेल असे मला वाटत नाही. समर्थांच्या सर्व कार्याचा आशय यात येतो. त्यांनी धर्मकारण व राजकारण लोकाभिमुख केले. स्वराज्य व स्वधर्म यांच्या संरक्षणाची व उत्कर्षाची जबाबदारी लोकावर आहे हे महान् सत्य त्यांनी मराठ्यांना शिकविले. यालाच राष्ट्रनिर्मिती म्हणतात.