पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६३
स्वराज्य आणि स्वधर्म
 



येकची मागणे आता । द्यावे ते मजकारणे
तुझा तू वाढवी राजा । सीघ्र आम्हांचि देखता ॥

हे मागणे मागताना समर्थांनी मातेला थोडे परखडपणेच बजावले की अनेक दुष्टांचा तू संहार केलास, असे आम्ही पुराणांतरी ऐकले आहे. पण तो तुझा पराक्रम आता आम्हांला प्रत्यक्ष दिसायला हवा आहे. मागल्या कथांवर आम्ही संतुष्ट नाही. ते सामर्थ्य आता प्रत्यक्ष दाखव आणि शिवरायाची राजमुद्रा प्रतिपदेच्या चंद्ररेखेसारखी वर्धिष्णू आणि विश्ववंदिता होऊ दे.

शिवकल्याणराजा
 महाराष्ट्राचा राजा कसा असावा याविषयीचा एक महान आदर्श समर्थांच्या मनात होता. शिवछत्रपतींच्या रूपाने तो प्रत्यक्षात अवतरत आहे, हे दिसताच त्यांना मोटा हर्ष झाला आणि १६४९ साली या शिवकल्याणराजाला एक पत्र लिहून त्यात त्यांनी हे चित्र उभे केले. 'नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती । पुरंदर आणि छत्रपती । शक्ती पृष्ठभागी ॥' पायदळ, घोडदळ, गजदळ, किल्ले, आरमार, सरदार, सेनापती अशी शक्ती या छत्रपतींच्या मागे उभी असावी. या बळावरच तो यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत होतो. त्याच्या राजसभेत पंडित, पुराणिक, कवीश्वर, याज्ञिक, वैदिक आणि धूर्त, तार्किक असे सत्तानायक असावे. शिवछत्रपतींनी हा सर्व संभार जमविण्यास प्रारंभ केला होता. आणि 'कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले' अशी त्यांची कीर्ती झाली होती. म्हणून समर्थांनी 'या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा (दुसरा कोणी) नाही ! महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करिता ॥' असा गौरव करून शेवटी धर्मस्थापनेची ही कीर्ती संभाळली पाहिजे, असा त्यांना आशीर्वाद दिला.
 श्रेठ कर्त्या राजाची आणखी काही लक्षणे समर्थांनी इतर काही प्रकरणातून सांगितली आहेत. महाराष्ट्राचा राजा स्वयंप्रज्ञ आणि खबरदार असला पाहिजे. तो लोकांच्या गोष्टीने वर्तता कामा नये. 'जो सिकवल्या बोले वर्ततो तो म्हैसमंगळू होय.' अशा राजाच्या राज्यात, 'धणी तो राहिला मागे, कारबारीच नासती.' असा राजा असणे हे लोकांचे पापच होय. 'या लागी सर्व सांभाळी तोचि साहेब नेटका.' आपल्या हुकमतीत त्याने सर्वांना ठेविले पाहिजे. तेणे सौख्य बहूजना.

कार्यकर्ते
 राजाने भोवताली उत्तम कार्यकर्ते जमवून त्यांच्या हातून कामे करवून घेतली पाहिजेत. 'आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहून काम सांगावे.' अशा कार्यकर्त्यांच्या गुणे कार्यभाग होतो. शिवछत्रपती स्वतःच दर वेळी सैन्याच्या आघाडीवर असत. समर्थांचा सल्ला असा की 'धुरेने युद्धास जाणे । अशी नव्हेत राजकारणे । धुराच करोनि