पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११.
साहित्य, कला व विद्या
 



 सातवाहन ते यादव या पंधराशे वर्षांच्या दीर्घ कालखंडातील सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या पाच महाराष्ट्रीय राजघराण्यांच्या स्वराज्य साम्राज्याचा, पराक्रमाचा, राज्यकारभाराचा आणि तत्कालीन इतर राजसंस्थांचा इतिहास येथवर आपण पाहिला. त्याचप्रमाणे तत्कालीन धर्म, समाजरचना व आर्थिक जीवन यांचेही स्वरूप आपण अभ्यासिले आता साहित्य, कला, विद्या इ. संस्कृतीच्या इतर घटकांचा विचार करावयाचा आहे. त्यांतील साहित्याचा प्रथम विचार करू.

( १ ) साहित्य
 अगदी पहिल्या प्रकरणात मराठी भाषेची परंपरा विवरून सांगितली आहे. मूळ भाषा संस्कृत. तिच्यापासून भिन्न प्रांतांत भिन्न प्राकृत भाषा निर्माण झाल्या. त्यांतील महाराष्ट्री प्राकृत ही महाराष्ट्राची सातवाहनकाळची भाषा होय. या महाराष्ट्रीपासूनच पुढे अपभ्रंश भाषा निर्माण झाली. हिलाच प्रथम देस भासा म्हणत. आणि तिचाच विकास होऊन यादवकालीन सराठी सिद्ध झाली. तेव्हा साहित्याचा विचार करताना प्रथम महाराष्ट्रीतले साहित्य, नंतर महाराष्ट्री अपभ्रंश साहित्य आणि नंतर यादव-