अपकर्षाच्या अनेक कारणांपैकी निबंधकारांनी प्रचलित केलेला विकृत धर्म हे, माझ्या मते, प्रधान कारण होय.
मीमांसा
मीमांसा दर्शनाचा मूळ कर्ता जैमिनी हा होय. इ. स. पूर्व ३०० ते इ. स. १०० असा त्याचा काळ मानला आहे. वेद अपौरुषेय असून त्यांनी सांगितलेला श्रीधर्म हाच स्वर्गप्रद होय असे जैमिनीचे मत होते. हा यज्ञयाग-प्रधान श्रीधर्म व्यवस्थित आचरता येण्यासाठी वेदांचा अर्थ निश्चित समजणे अवश्य आहे. तो अर्थ कसा योग्य तऱ्हेने लावावा हे सांगण्यासाठी प्राधान्याने मीमांसाशास्त्राचा जन्म झालेला आहे. आणि तेवढ्याच दृष्टीने पाहता त्याचे महत्त्व आजही मानले जाते. पण त्याबरोबरच वेदांचे अपौरुषेयत्व, शब्दप्रामाण्य व अदृष्टवाद ही तत्वेही मीमांसेने सांगितलेली आहेत. ती मात्र स्वीकार्य नाहीत. आणि जैमिनीच्या समकालीनांनी व पुढेही हजार वर्षांच्या काळातील स्मृतिकारांनी ती स्वीकारली नाहीतच. जैमिनीच्या सूत्रावर भाष्य लिहिणारा शबर हा इ. सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेला. आणि त्यानंतर आठव्या शतकात आज रूढ झालेल्या मीमांसाशास्त्राचा प्रवर्तक कुमारिलभट्ट हा झाला. आपल्याला त्याचे शास्त्र पाहावयाचे आहे.
बुद्धिहत्या
वेद अपौरुषेय आहेत, सर्व धर्मव्यवहारात तेच प्रमाण मानले पाहिजेत. धर्मशास्त्रात पुरुषबुद्धीला अवसर नाही, हे सिद्धान्त तर त्याने सांगितलेच; पण याशिवाय सर्व स्मृतीही प्रमाण मानल्या पाहिजेत, असे मत त्याने मांडले. शबरस्वामींना हे मान्य नव्हते. काही स्मृती लोभाने, मोहाने, स्वार्थाने लिहिल्या जातात, असे त्यांनी म्हटले आहे. कुमारिल भट्टांना हे मान्य नाही. स्मृती या वेदाप्रमाणेच मानल्या पाहिजेत, कारण सर्व स्मृती वेदमूल आहेत, असा त्यांचा आग्रह आहे. या आग्रहातून दुसरा एक विचित्र आग्रह निर्माण झाला. तोच हिंदू समाजाच्या नाशाला कारण झाला आहे असे वाटते. स्मृती या भिन्न काळी झालेल्या आहेत, आणि त्यांत अत्यंत परस्पर विरोधी मते सांगितलेली आहेत. मग प्रश्न असा आला की परस्पर-विरोधी स्मृतीतून कोणती स्मृती प्रमाण मानावयाची व एक प्रमाण मानली तर दुसरीच्या प्रामाण्याचे काय करावयाचे ? यावर कुमारिल भट्टाचे उत्तर असे: सर्व स्मृती एकाच मताच्या आहेत, त्यांत परस्पर विरोधी मते नाहीतच, असे टीकाकारांनी दाखवून दिले पाहिजे. पतिनिधनानंतर स्त्रीने सती जावे, असे एक स्मृती सांगते; जाऊ नये, असे दुसरी सांगते. या दोन्ही वचनांचा एक अर्थ आहे असे निबंधकाराने दाखविले पाहिजे, म्हणजेच त्याने त्या वचनांचा समन्वय केला पाहिजे असे भट्टपाद म्हणाले आणि दुर्दैव हे की पुढील सर्व टीकाकारांनी, निबंधकारांनी, धर्मशास्त्रज्ञांनी त्यांची
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१९७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१७०