पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११७
राजसत्ता
 

विचार करीत आहो त्या कालखंडात महाराष्ट्रात प्रजासत्ताक राजपद्धती होती असे कोणीही म्हटलेले नाही. येथे अखंडपणे केवळ राजसत्ताच प्रभावीपणे शासन करीत होती. त्या काळात राष्ट्र, आहार, विषय, ग्राम असे राज्यकारभाराच्या सोयीसाठी देशाचे विभाग केलेले असत. या विभागांच्या कारभारावर राजसत्तेचे नियंत्रण असले तरी त्यांना अंतर्गत स्वायत्तता होती, तेथे स्थानिक स्वराज्य होते, असे डॉ. आळतेकर, डॉ. रमेशचंद्र मुजुमदार या पंडितांचे मत आहे. या स्थानिक स्वराज्यांचे स्वरूप काय होते, त्यांचा प्रभाव किती होता याविषयी पुढे विवेचन येईलच. येथे ध्यानात घ्यावयाचे ते एवढेच की राजाची निवड करणे, त्याला पदच्युत करणे, वारशाचा निर्णय करणे यासंबंधीचा कसलाही अधिकार या स्वराज्यसंस्थांना नव्हता. आनुवंशाच्या रूढीने व प्रभावी राजपुरुषांच्या शस्त्रानेच त्याचा निर्णय होत असे.

वंशपरंपरा
 सातवाहनांचा पहिला राजा सिमुक हा मृत्यू पावला तेव्हा त्याचा पुत्र सातकर्णी हा लहान होता. तेव्हा आनुवंशाच्या रूढ नियमाअन्वये सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. राजा सातकर्णी दुसरा हा मृत्यू पावला तेव्हा त्याचे पुत्र वेदिश्री व सतिश्री है अल्पवयी होते. त्या वेळी त्यांची आई राणी नायनिका हिनेच ते वयात येईपर्यंत राज्यकारभार चालविला होता. वरील प्रकारच्या स्वायत्त संस्थांनी दुसरी कसलीही व्यवस्था त्याच वेळी केल्याचे इतिहास सांगत नाही. पुढे सातवाहन राज्यावर शकांचे आक्रमण आले. त्यांचे साम्राज्य नष्ट होण्याची वेळ आली. तेव्हा त्या आक्रमणाचा निःपात केला तो दोन दुबळ्या राजांनंतर उदयास आलेल्या गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने आणि तोही शस्त्रबलाने. त्यानंतरही शकांचे पुन्हा एकदा आक्रमण आले होते. तेही सम्राट यज्ञश्री यानेच मोडून काढले. या सर्व घडामोडींत महाराष्ट्राची जनता जरी सातवाहन साम्राटांच्या पाठीशी होती तरी तिला काही प्रभावी मत होते, काही निर्णय करून त्याचा अंमल करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी होते, असे केहाही दिसून आले नाही.
 सातवाहनांच्या नंतर इ. स. २५० ते ५५० वाकाटकांचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते. त्यांच्या इतिहासावरूनही हेच दिसते. ग्राम, विषय, राष्ट्र या विभागांत त्यांच्या काळीही स्वराज्य होते. श्रेणी, पूग, अशा व्यापारी वर्गाच्या स्वायत्त संस्थाही असल्याचा पुरावा मिळतो. पण राजपदाचा किंवा वारसाचा निर्णय करण्याचा अधिकार त्यांना होता असे दिसत नाही. त्यांनी केव्हाही कोठेही हस्तक्षेप केल्याचे उल्लेख नाहीत. आनुवंशिक राजसत्तेचे तत्त्व विनातक्रार त्यांनी मान्य केलेले होते, असेच दिसून येते. विंध्यशक्ती हा वाकाटकांच्या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा पुत्र प्रवरसेन हा वाकाटक वंशातला अत्यंत बलाढ्य राजा. त्याला चार पुत्र होते. आणि प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर या चार पुत्रांनी पित्याच्या साम्राज्याची वाटणी करून चार स्वतंत्र राज्ये स्थापन