पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
११८
 

केली. सर्व चारही शाखांचे इतिहास आज उपलब्ध नाहीत. पण नंदिवर्धन व वत्सगुल्म या शाखांची माहिती मिळते. तीवरून असे निश्चित दिसते की राज्य, साम्राज्य ही वाटणी करण्याजोगी वडिलार्जित मिळकत आहे, असेच मत तेव्हा रूढ होते व ते लोकांनाही मान्य होते. साम्राज्याची अशी चार भावांत वाटणी झाल्यामुळे ते फार कमजोर झाले. पण वरीलपैकी कोणतीही संस्था तो अनर्थ टाळू शकली नाही.

खाजगी जिंदगी
 वाकाटकांच्या नंतर महाराष्ट्रात चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यातील एक राजा कीर्तिवर्मा हा मृत्यू पावला. त्या वेळी त्याचा पुत्र सत्याश्रय पुलकेशी हा लहान होता. त्यामुळे कीर्तिवर्म्याचा भाऊ मंगलीश हा गादीवर आला. त्याने आपल्यामागून खरा वारस जो पुलकेशी त्याला डावलून आपल्या पुत्राला गादी देण्याची खटपट चालविली. या वेळी लोकमत जर प्रभावी असते तर त्याने मध्ये पडून काही निर्णय केला असता. पण तसे काही झाले नाही. पुलकेशीला चुलत्याशी लढाई करून, त्याचा रणांगणात निःपात करूनच राज्य मिळवावे लागले. पुलकेशी हा महापराक्रमी सम्राट होता. त्याने पूर्वकिनाऱ्यापर्यंत आंध्रप्रांतात आणि पश्चिमेस व उत्तरेस लाट, गुर्जर व मालव या प्रांतांतही आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. आणि सत्ताप्रस्थापनेनंतर हे प्रांत खाजगी जिंदगी दान द्यावी त्याप्रमाणे आपला भाऊ विष्णुवर्धन व इतर आत यांना देऊन टाकले. आंध्र प्रांतात व गुजराथेत या दोन भावांच्या घराण्याची सत्ता अनेक शतके चालू होती. तेथील लोकमताने त्याला कधीही विरोध केल्याचे इतिहासात नमूद नाही. दक्षिणेत तर स्वायत्त संस्था विशेष प्रभावी होत्या असे म्हणतात !

वारशाची युद्धे
 सुमारे ७५३ साली चालुक्यांच्या सत्तेचा अंत झाला व दंतिदुर्ग या महापराक्रमी राजाने राष्ट्रकूट घराण्याच्या राज्याची महाराष्ट्रात स्थापना केली. हे घराणे पराक्रम, साम्राज्यवैभव, राजपुरुषांचे कर्तृत्व यासाठी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासातही फार प्रसिद्ध आहे. पण या घराण्यात दर पिढीला वारसाविषयीचे कलह अटळ झाले होते. दंतिदुर्गाला पुत्र नव्हता आणि भाऊही नव्हता. तेव्हा त्याचा चुलता कृष्ण हा सत्तारूढ झाला. त्याच्यामागून त्याचा पुत्र गोविंद हा गादीवर आला. पण लवकरच तो विलासमग्न झाला व त्यामुळे राज्यकारभारात गोंधळ निर्माण होऊ लागला. तरीही राज्यव्यवस्थेत लोकांनी किंवा सरदारांनी, किंवा महाजनांनी हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही. तशी पद्धतच नव्हती. त्यांना ते सामर्थ्य नव्हते आणि रूढीचे पाठबळही नव्हते. गोविंदाचा भाऊ ध्रुव यालाच शस्त्रबळाने त्याला पदच्युत करून राष्ट्रकूट घराण्यावरील आपत्ती टाळावी लागली. ध्रुवाने आपला ज्येष्ठ