पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५.
राजकीय कर्तृत्व
 

( वाकाटक ते यादव )


 वाकाटक ते यादव-अखेर या हजार-अकराशे वर्षांच्या कालखंडातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची अत्यंत स्थूल रूपरेखा आपण प्रथम पाहिली आणि नंतर या पाचही राजघराण्यांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित केले. आता या प्रत्येक घराण्याच्या राजकीय कर्तृत्वाचा इतिहास आपणांस थोड्या तपशिलाने पहावयाचा आहे.

वाकाटक
 सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाल्यावर त्यांच्या साम्राज्याच्या निरनिराळ्या विभागांत त्यांच्याच सेनापति- सरदारांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली. तामिळनाडमध्ये पल्लव घराणे उदयास आले, आंध्र देशात इक्ष्वाकूंनी सत्ता स्थापन केली. विदर्भात आणि दक्षिणेकडील वनवासी प्रांतात सातवाहनांच्याच शाखांचे राज्य झाले. पश्चिम महाराष्ट्रात याच वेळी आभीर या शककुशाणांसारख्याच एका परकी जमातीचे राज्य स्थापन झाले. ईश्वरसेन हा या राजवंशाचा मूळपुरुष होय. या वंशात एकंदर दहा राजे झाले व त्यांनी एकंदर सदुसष्ट वर्षे राज्य केले. नंतरच्या शंभरदोनशे वर्षांत महाराष्ट्राच्या भिन्न प्रदेशांत नल, भोज, त्रैकूटक व राष्ट्रकूट असे भिन्न वंश उदयास आले. कधी त्यांची राज्ये स्वतंत्र असत तर कधी गुप्त, वाकाटक यांचे ते मांडलिक म्हणून राज्य करीत. यांतील राष्ट्रकूट हेच पुढे चालुक्यानंतर आठव्या शतकाच्या मध्याला साम्राज्य संस्थापक झाले. पण तो इतिहास पुढचा आहे. इ. सनाच्या तिसऱ्या शतकात वरीलपैकी सर्व वंश क्षुद्रावस्थेतच होते. याचवेळी वाकाटकांचा उदय झाला. यांचा