पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८१
महाराष्ट्रीय राजघराणी
 


स्वराज्य आणि साम्राज्य
 मग या चालुक्यांचा कर्नाटकाशी संबंध कोणत्या प्रकारचा होता ? कर्नाटकावर चालुक्यांचे साम्राज्य होते. त्यांच्या दक्षिणेतील बहुतेक सर्व राज्यकर्त्यांशी नित्य लढाया चालु असत. कांचीचे पल्लव हे त्यांचे कायमचे वैरी. त्यांच्याशी दर पिढीला एकदा तरी लढाई व्हावयाची हा या पश्चिम चालुक्यांच्या राजवटीचा नियमच होता. पल्लवांचे राज्य आजच्या मद्रास प्रदेशात होते. त्यांच्या पलीकडे कावेरीच्या दक्षिणेस पांड्य, चोल व चेर (केरळ) ही राज्ये होती. यांनाही चालुक्यांनी अनेक वेळा जिंकून आपले मांडलिक बनविल्याचे इतिहास सांगतो. पश्चिमेच्या बाजूस कावेरीच्या उत्तरेस व तुंगभद्रेच्या दक्षिणेस गंग, वनवासी, बाण, अलूप ही राज्ये होती. हा कर्नाटक प्रांत होय. वनवासी व वैजयंती हा कदंबाचा प्रांत म्हणजे उत्तर म्हैसूर होय. आणि गंगांचा गंगवाडी म्हणजे दक्षिण म्हैसूर होय. अलूपांचे राज्य शिमोगा जिल्ह्यातील उडुपी येथे होते. या सर्व कानडी राज्यांशी चालुक्यांचे अखंड वैर होते. त्यांच्यावर स्वाऱ्या करून चालुक्य सम्राट कीर्तिवर्मा, पुलकेशी २ रा, विनयादित्य यांनी त्यांना अनेक वेळा मांडलिक बनविले होते, आणि त्यांना नमवून मांडलिक बनविण्यात चालुक्यांना भूषण वाटत असे, असे त्यांच्या कोरीव लेखांवरून दिसते. आता त्यांना नमविल्यानंतर त्यांच्याशी स्नेह जोडून त्यांच्याशी सोयरीक केल्याचेही उल्लेख इतिहासात आहेत. पण तो भाग निराळा. त्यामुळे कर्नाटक प्रदेश हे बदामीचे चालुक्य स्वराज्य मानीत नसत हे विधान बाधित होत नाही. पल्लवांच्या इतके नाही पण त्याच्या खालोखाल कदंब, गंग, अलूप यांशी चालुक्यांचे वैरच होते. याचा स्पष्ट अर्थ असा की पांड्य, चोल, केरल, पल्लव, कलिंग, आंध्र हे चालुक्यांना परके, तसेच कर्नाटकातले लोकही चालुक्यांना परके होते. ते त्यांचे स्वजन नव्हते. त्यांनी पराक्रम केला, वैभव प्राप्त करून घेतले ते सर्व महाराष्ट्रीयांसमवेत होय. इतर प्रदेशांत मूळ सत्ता स्थापून त्यांनी महाराष्ट्राला मांडलिक बनविल्याचे त्यांच्या वंशाच्या इतिहासात, एकाही कोरीव लेखात म्हटलेले नाही. त्यांचे महाराष्ट्रात स्वराज्य होते व इतर प्रांतांवर साम्राज्य होते.

उपार्जित स्वराज्य ।
 चालुक्यांच्या एका शिलालेखात याच शब्दात हा भेद स्पष्ट केला आहे. सत्याश्रय पुलकेशी २ रा, याचा पुतण्या नागवर्धन याने एक गाव ब्राह्मणाला दान दिले. त्याचा ताम्रपट डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मूळ संहिता व भाषांतर यांसह दिला आहे. हा ताम्रपट गोपराराष्ट्रातला म्हणजे नाशिक जिल्ह्यातला असून इगतपुरीपासून बारा मैलांवरचे बलेग्राम हे गाव दान देण्यासाठी तो लिहिलेला आहे ( कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. ७३ व २७२ ). या ताम्रपटात पुलकेशीचे वर्णन केले आहे. हा पुलकेशी कीर्तिवर्म्याचा पुत्र. कीर्तिवर्मा मृत्यू पावला तेव्हा तो लहान होता. म्हणून कीर्तिवर्म्याचा भाऊ मंगलीश हा गादीवर आला. पण पुढे सिंहासन आपल्याच मुलाला