Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पद नववें. चाल --- तूं टाक चिरुनि ही मान. भक्तिनें पुजा प्रभुराय | धरोनी पाय | जागं एक असे या, भव तरण्याला, भक्ती स्वल्प उपाय ॥धृ०॥ , अव्यक्त ब्रह्म बहु कठिण । म्हणुनिया मूर्तिही सगुण । भक्तिनें पुजों मार्न अणुन । त्या जन्म मरणही, चुकेल सांगे, पार्थार्ते प्रभुराय ॥ १ ॥ इंद्रिये युक्तिने रोधा | प्रभुचरणीं स्थिर मन बांधा। हृदयांत मूर्ति मग शोधा जरि कराल ऐसें, तरिच दयाघन, दाविल अपुले पाय ||२|| इतुकेहि जरी नच करवे । तरि नाम मुखानें गावें । कर्मार्पण हरिस करावें । तरी पावे मत्पद प्राणी, श्रीहरि, सांगे स्वल्प उपाय || ३ || सर्वात शांति बहु श्रेष्ठ । परि एकच होय वसिष्ट । ज्ञानाधिन शास्त्रे बिकट । यालागी संतीं, सगुण भक्तिचा कथिला सुलभ उपाय ॥४॥ दृढ धरुनि चित्तिं सद्भाव | मुखं गावें प्रभुचें नांव । प्रकटेल हृदयि मग देव । श्रीतुकाराम, ज्ञानेश्वर सांगति, निश्चित हा सदुपाय ॥५॥