Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ हरिकथानिरूपण आधीं तद्नंतर इतर उपाधी । प्रभुकृपा टाळिते व्याधी । श्री रामदास स्वामीही सांगती सर्वा हाच उपाय ॥ ६ ॥ नच करणे व्रत उपवास । शास्त्रादिक जड अभ्यास | व्हावया ईश प्राप्तीस | सांगितला संत भक्तिमार्ग हा, सर्वा सुलभ उपाय ॥ ७ ॥ परदास्य नरकवासास । चुकविणे हीच जरि आज । स्वातंत्र्य स्वर्ग मिळण्यास | व्हा लीन हरिपदी, कृष्णात्मजही, प्रेमें हरिगुण गाय ॥८॥ - पद दहावें. सारंग – जमुनातट. करुणाकर प्रार्थि प्रभो तुज ॥ धृ० ॥ त्राहि त्राहि बघ षड्रिपु करिती । सुचुं न देत तव नाम दयाळा ॥ १ ॥ मन मम स्थिर हे मुळीं न राहतें । कसे दिसे ? तव ध्यान हरीरे ॥ २ ॥ लीन दीन हा चरणीं तुमच्या । अभय मला द्या स्थान पदाब्जीं ॥ ३ ॥