Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ - पद सातवें. भीमपलास – प्रेमसेवा. श्रीगणेशा शरण, सकल जाऊं चला ॥ तोचि करिल हरण दास्ययातनेला ॥ १ ॥ न्यायासनीं अंध | साधूजनां कैद | कांहीं न धरबंद | ब्युरॉक्रसीला ॥ २ ॥ खाण्या न हिन्दांस | कपडा न गरिबांस । षंढत्व दे खास ॥ परराज्य सकलां ॥ ३॥ अवतार प्रभुराज । घेवोनियां आज । राखी आतां लाज ॥ प्रार्थना ही तुला ॥ ४ ॥ पद आठवें. भैरवी- राम पाहिला. धांव लौकरी | बघसि । अंत कां हरी ॥ धृ० ॥ धर्मग्लानि जाहली । नास्तिकवृत्ति मातली । कठिण वेळ पातली | सज्जनांवरी ॥ १ ॥ सत्यधर्म सोडुनी । बागती किती जनीं । शासिता तया कुणी । होईना परी ॥ २ ॥ पूज्य जी आम्हां अती । गोमाता तिज वधिती । बघतां हे जळत अती | हृदय अंतरीं ॥ ३ ॥ धर्मरक्षणार्ध कीं। नृपतीपद हे लोकीं । राज्ययंत्र परि परकी। आज हें वरी ॥ ४ ॥ धर्मरक्षणा तरी । अवतर तूं श्रीहरी । आर्यदेश उद्धरी । मर्दुनी अरी ॥ ५ ॥