Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ पद चवथें. मल्हार - शान्त हरि. वंद्य मज एक जाग आर्यभूमी खरी ॥ तद्यशोगायनीं रमत ही वैखरी ॥ धृ ॥ धर्मजनकादिकां । जी खनी प्रसवली ॥ 'कर्मभू' भूतलीं । गर्जली अजवरी ॥ १ ॥ धर्मक्षय होइतो । श्रीहरी धांवतो ॥ संकटीं रक्षितो । मायभूमी परी ॥ २ ॥ - . पद पांचवें राग - सोहनी. श्रीगणपति गुणगान ॥ आधीं ॥ धृ० ॥ ब्रह्मादिकही कार्यारंभीं। करिति गजानन ध्यान ॥ १ ॥ कार्यसिद्धि होण्यातें करणे । प्रभुनामामृत पान ॥ ॥ २ ॥ भवभयहारक हाच विनायक | स्तवितां मिळते ज्ञान ॥ ३ ॥ कलीयुगामधिं चंांडे-विनायक । दैवत कथिले जाण ॥ ४ ॥ महाराष्ट्र मेळाही आधीं । करित गजानन गान ॥ ५ ॥ भैरवी --नृपतिकन्या. पद सहावें. प्रकट जगतीं त्वरि आ ऽऽऽ तां । वीर महाराष्ट्रा ॥ धृ ॥ आठवी शिव भूपती | आठवी तच संस्कृती || कलह मोढी । ऐक्य जोढी । यांत गोढी । मर्द महाराष्ट्रा ॥१॥ 'नर जरी करणी करी । बनत तो जगतीं हरी ॥ वचन असलें । सत्य केलें । उद्धरीलें। बद्ध महाराष्ट्रा ॥ २ ॥ तोच तूं अजि राजसा । बंदिवान् बनसी कसा ॥ कृष्यवृत्ती । त्यजुनि जगतीं । मिळाव कीर्ति । ऊठ ऊठ आतां ॥ ३ ॥