Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ धन-धान्य-साधनों भरला । दुसन्यांसी पुरुनी उरला ॥ परि अन्नाविण हो ठार | अजि पहा देश हा आपुला ॥३३ परक्यांनी यावे जावें । मनसोक्त तुम्हांसि लुटावे ॥ ना कुणासही दरकार । हो षंढ कसेरे बनलां ॥ ४ ॥ शुभस्मरण करा पितरांचें । शिव-समर्थ- बलवंताचें ॥ या क्षणीं करा निर्धार । दुस्मान-कंदना पहिला ॥ ५ ॥ व्या सत्याची समशेर । धैर्याचा ध्या घ्या तीर ॥ जोरसे कराया वार | जो भेदि शत्रु- हृदयाला ॥ ६ ॥ सरपुरुष समागम ढाल । घेउनी करा तुम्हि चाल | फोदुनी करा खिंडार परमात्मरूप बघण्याला ॥ ७ ॥ स्वातंत्र्यसमाधी लावा । सच्छील सुमार्गी लावा ॥ बलबन्ता तुज हा द्दार । वाहतो प्रभु शिरकमला ॥ ८ ॥ - पद तिसरें. चाल—आनबान. - - बंदुं हिन्द - देवि - तनय, तिलक गुरुवरा ॥ धृ० ॥ राष्ट्रोद्धर, जनहितकर | धीर वीर अग्रणि नर ॥ दिनदुनियेचा आधार | कोहिनुर हिरा ॥ १ ॥ श्यामवर्ण घननिलसम । दिव्य मूर्ति शोभमान ॥ प्रकटवि देशाभिमान | सगुण साजिरा ॥ २ ॥ ध्याऊं गाऊं गुणनिधान । सुयश कीर्ति धन्य धन्य ॥ जनताप्रिय लोकमान्य | शोभसी खरा ॥ ३ ॥ देशाचा न्हास होई । वालि त्यासि कोणि नाहीं ॥ गांधि महात्माहि पाही। बंधनीं खरा ॥ ४ ॥ उगवे नव कमल जलीं । विकसवि तव तेजबली ॥ अवतरोनी या कालीं। इंदुशेखरा ॥ ५ ॥