Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र मेळ्याचीं पधें. पद पहिलें. चाल - चळारे गणराया बंदा. - नमो श्रीगणनायक पहिला || पार्वतिसुत गंगाधरतनया, अखिल विश्वपाळा ॥ धृ० ॥ नमो श्रीसरस्वती देवी । ज्ञानसत्र तव अम्हां बालकां, सदा खुले ठेवीं ॥ १ ॥ नमो श्रीऋषिगण मुनिदेवा । वरदहस्त तो सदा कृपेचा, अम्हांवरी ठेवा ॥ २ ॥ नमो श्रीसंत कवीशांतें । उपदेशामृत ज्यांचे जागृत, मृतासही करितें ॥ ३ नमो श्रीपूर्वज वीरांना । बीररसाची हृदया भरती, स्वातंत्र्य आणा ॥ ४ ॥ नमो श्रीआर्यभूमिमाते । स्वातंत्र्यास्तव तुझ्या अर्पुया, नश्वर देहातें ॥ ५ ॥ नमो श्रीजनता जगदीशा । "महाराष्ट्र मेळा " हा मागे, कृपेचीच भिक्षा ॥ ६ ॥ 6" - - पद दुसरें. चाल – त्यजि भक्तासाठीं. श्रीगंगाधरतनया | तारिया हिन्दू जनतेला ॥ धृ || श्रीराम कृष्ण हनुमंत | ज्ञानोबा तुकया संत || अवतार झरा अनिवार । हा कसा कोरडा पढला ॥ १ ॥ सिंहाचे बच्चे असुनी। मेंढरें कशीं जा बनुनी ॥ स्वाभिमान झाला ठार | अंधार भयंकर पढला ॥ २ ॥