Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( बापट ), सुप्रसिद्ध कवि अज्ञातवासी, ह. भ. प. पुरुषोत्तमबोवा जोशी या सर्वांनी नवीन पद्ये सांगतांक्षणींच मोठ्या प्रेमानें करून दिली; याबद्दल या सर्वांचे जितके उपकार मानावे तितके थोडेच. तसंच माझे मित्र गायन - शिक्षक श्री • दिवेकर व ड्रील शिक्षक श्री • पर्वते यांची मदत तर विनमोलच झाली आहे. म्हणून त्यांचे आभार कोणत्या शब्दांनी मानावे तें समजत नाहीं. - शिवाय ज्या पालक मंडळीनी आपली मुले मेळ्यांत पाठवून लोकशिक्षणाच्या ह्या पवित्र कार्यात मला जी मदत केली त्याबद्दल त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेंच आमचे शिंपी-कोर्टासमोरचे श्री • चांदेकर यांनी वेळेवर व थोड्या खर्चात कपडे बगैरे शिवून दिल्याबद्दल; व 'विजय' प्रेसचे मालक श्री • आप्पासाहेब गोखले यांनी पुस्तकाची छपाई स्वस्त, सुबक व वेळेवर करून दिल्याबद्दल त्यांचा; आणि तुळशीबागे- जवळील काष्ठौषधी दुकानांतील पेन्टर श्री० ढेकणे, यांचा व श्री• गोबडे यांनीं भाले बगैरे उत्तम तयार करून दिल्याबद्दल त्यांचा; या सर्वोचा मी अत्यंत आभारी आहे. याशिवाय अनेक मदतगार मंडळींचे मजवर उपकार आहेल. त्यांचे विस्मरणानें अगर अन्य काही कारणानें आभार मानणे राहिले आहे, त्यांनीं क्षमा करावी. व सालाबादप्रमाणे सर्व हित- चिंतकांस शक्य तितकी जास्ल मदत करण्याची बुद्धि व अनुकूलता दे, अशी श्रीगणेशचरणी प्रार्थना करून हे लांबलेलें कंटाळवाणं गद्य निंबदन संपवितों. मिति भाद्रपद शु. ४ शके १८४५ ता. १४/९/२३ -

}

शंकर कृष्ण पेठे, व्यवस्थापक.