Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गद्यनिवेदन. B श्री गणेशोत्सवांत जन- मनरंजन करून लोकशिक्षणाचे पवित्र कार्यास यथाशक्कि हातभार लावावा म्हणून महाराष्ट्र मेळा दरसाल निघत असतो. तसेंच आळीकर थोर गृहस्थांपैकी विशेषतः श्री० बर्वे, नातू, जोगळेकर आणि बापट इत्यादि मंडळीचा सर्वशहर- भर आप्तेष्टांचा व स्नेहीसोबलांचा संबंध असलेमुळें, मेळ्यास सर्वोच प्रेमाचें निमंत्रण स्वीकारून सार्वजनिक गणपतीपुढे हजेरी देतां येत नाहीं; व निमंत्रित घरी न जावें तर लीं घरें स्नेहसंबंधाची व आप्तेष्टांची असल्यामुळे त्यांचा आमचे तरुण मंडळीवर मोठा घुस्सा होतो; म्हणून चालूं साली मेळ्याचे दोन भाग केले आहेत. एक प्रौढ विद्यार्थ्यांचा व दुसरा वीस वर्षांपेक्षा कमी वयाचे बिद्यार्थ्यांचा. शिवाय चालू सालीं जो लहान विद्यार्थ्यांचा मेळा आहे, तो विशिष्ट धोरणानेंच बागणार आहे. व त्याची एकंदर रचना, धोरण व पद्धत हीं कांहीं विशेष रीतीने केली आहेत हैं सर्वास विचारांती दिसून येईलच. A - याकरितां सदरहू मेळ्याचें कार्य व पद्धत ही पसंत असल्यास त्याचें कोडकौतुक पुरवून त्यास सर्व प्रकारें मदल करणे हें जनलारूपी जनार्दनाचेच हातांत आहे. आणि यावरच मेळ्यांतील आम्हां लरुण मंडळीचे पुढील विचार व लोकोपयोगी संस्थांना पैशाची मदत करणे इत्यादि गोष्टी अवलंबून असतात. हेंही सुज्ञ लोक विसरणार नाहीत अशी आशा आहे. चालू साली आमच्या आळीतील श्रीमंत सरदार दाजीसाहेब नातू यांच्या पत्नी सौ• इंदिराबाई नातू, आळीकर मित्र 'बलवन्तानुज'