Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ आसेतुहिमाचल जावें । जाने करुणध्वनि ऐकावे | हे असे दिवस कां यावे ॥ भारता० ॥ ५ ॥ येथले धनी जे मूळ । जे ये त्यांना पडता काळ । ते निव्वळ बनले कूळ ॥ भारता० ॥ ६ ॥ कां पुरे न झाली झोप । ओळखी विषारी सर्प । रज्जुला नको म्हणुं साप ॥ भारता० ॥ ७ ॥ अवदसा लयाला जावी । सुस्थिती आपणां यावी । कारणे दुही टाकावी ॥ भारता० ॥ ८ ॥ चल ऊठ लाग कार्याला । हा सांप्रत मोका आला । तूं अजिंक्य हो जगताला || भारता फुंक फुंक रणशिंग ॥ ९ ॥ पद शेवटचें. चाल–ब्याँडची [ मार्चिगसाँग.] हिन्दभूमि तारणा, आर्यदास्य हारणा || दुष्ट नष्ट मारणा, चला उठा, चल। रणा ॥ सत्य कृत्य, सत्य वाक्य, सत्य तत्त्व, साधनीं ॥ सु-सज्ज होउनी चलाच, आत्मतेज साधनीं ॥ आर्यभूमि प्रेमला। नितांत रम्य निर्मला ॥ पर्ण पुष्प धारिणीम् । विश्ववंद्य मानिनीम् ॥ तिला स्मरूं कृती करूं, मनीं स्मरूं, गजानना ॥ आर्यभूमि तारणा, चला चला चला रणा ॥ १ ॥ • समाप्त.