Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

a. अशा जवानांचा मी बच्चा फुशारकी ही पुरे करा ॥ ज्याचें त्यासी शोभे मिळवा पराक्रमाने कीर्ति बरा ॥ ६ ॥ समर्थ गुरुचा समर्थ शिवचा समर्थ झाला, समर्थना || परकीयांच्या सेनालहरी मराठदळ सोडुनि पवना ॥ ७ ॥ भगवा झेंडा भगव्या रंगें साक्ष देतसे धर्माची ॥ मराठशाही संन्यस्तांची, योग्यांची, न तु भोग्यांची ॥ ८ ॥ गृह सुत द्वारा सर्व पसारा सोडुनि संन्यासी बनले ॥ योगी बनुनी योग साधुनी महाराष्ट्रपण रक्षियले ॥ ९ ॥ बाजीने ज्या झेंडचाखालीं पवनखिंड पावन केली ॥ धनाजिनें त्या शौर्यधनाने स्वराज्यनौका हकारिली ॥१०॥ राघोबानें रणधीरानें अटकेवर सेना नेली || वानवडीच्या महादजीने दिल्लीवर स्वारी केली ॥ ११ ॥ चिमाजिनें सर केली वसई मर्द मराठे खरोखरी ।। महाप्रतापी भगवा झेंडा फडकुनि गेला नभोदरीं ॥ १२ ॥ भगव्या झेंड्या तव लहरीवर मराठसेना नाचतसे ॥ कोटें आतां धुळीत पडला शोध तयाचा कुणा नसे ॥१३॥ महाप्रतापी शिवरायाची धर्मपताका राष्ट्रध्वजा ॥ खरे मराठे असाल तर ती मिळवा खर्चुनि निजतेजा ॥१४॥ भगव्या झेंडया थकतिल मोठे कविही वर्णू तुज जातां ॥ बलवन्तानुज शाहिर फिक्का पडलाही ना नवलकथा ॥१५॥ पद पंधरावें. चाल--सबसे रामभजन. हा परकी जादूगार, सारा मायेचा बाजार ॥ धृ० ॥ काय कशाने झाले पेसें, केला काय विचार ॥ ही सोन्याची धरा जाहली, अशी कशी बेजार ॥ १ ॥