Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ नवा काळ हा ध्यार्नि आणुनी नवें शस्त्र लोजावें ॥ महाराष्ट्र तव नाम सार्थ है त्रिभुवनांत गर्जावें ॥ ७ ॥ , श्रीशिवबाच्या राष्ट्रगुरूंच्या लोकमान्य टिळकांच्या || सिंहा आतां त्वरीत उडवी त्वद्रिपु-मर्कट फडशा ॥ ८ ॥ -- पद तेरावें. मालकंस – मनमोहन. प्रभु घ्या झार्ण, अवताराला ॥ धृ ॥ छळिती बिहु साधुजनांतें सत्वरि त्या संहाराला ॥ १ ॥ भारतियांच्या धर्मावरती । परसंस्कृति घालिति घाला ॥२॥ जन्मभूमि तव कर्मभूमिही । रक्षिण्यास गोपाला ॥ ३ ॥ पद चवदावें. (फटका) महाराष्ट्राचा भगवा झेंडा. महाप्रतापी भगवा झेंडा फडकुनि गेला नभोदरीं ॥ त्याची किंमत काय अम्हासी, पढतमूर्ख सत्त्वा वैरी ॥धृ०॥ काय तयांची महती वर्णं धन्य धन्य ते वीरमणी ॥ ज्यांनी जर्जर करुनी दुस्मन सत्व रक्षिले निबिड रणीं ॥१॥ त्यांचेवरुनी फडकत राहे भगवा झेंडा यशध्वजा ॥ प्रोत्साहन जो देश रक्षण्या धर्म-कूल-शिल निज तेजा ॥२॥ माते-उदरीं जन्म घेउनी मातृऋणासी फोडियलें ॥ निमकहरामी स्वार्थापायीं स्वराज्य आम्हीं घालविलें ॥३॥ दाणे टाकुनि मुंजविती पर, अम्हांसि आमुच्या लोकांत ॥ मोत्यांचे जरि घोंस तोडिले फोड न झाली त्यांच्यांत ॥४॥ नाम मराठे केवळ म्हणुनी मिशा पिळाव्या क्षणाक्षण । आजे, पणजे, बाप, भाई ते युद्ध मेले मम म्हणुन ॥५॥