Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पद अकरावें. राग-बागेश्री. गाऊं सदा प्रभुनाम । प्रेम ॥ धृ० ॥ परमेशाच्या नामा गातां । जळती अघनग आण ॥ १ ॥ भायें गातां प्रभुनामातें। पुरवित तो मनकाम ॥ श्रीरामाच्या नामै तरले । जडनिर्जिव पाषाण ॥ ३ ॥ नामवि तारक भवभयहारक । शांतिसदन सुखधाम ४ प्रभुनामार्ते गाण्या प्राण्या । पडति न कांहों दाम ॥ ५ ॥ महाराष्ट्र मेळाही गाई। आधीं प्रभुचे नाम ॥६॥ पद बारावें. चाल - सबसे राम० - महाराष्ट्र नांव ऐकोनी रिपुनें चळचळ कापावे ॥ धृ० ॥ परदास्याची बेडी तोडी एका झटक्यासरशी ॥ शिवरायाचा महाराष्ट्र तूं तोच आज का अससी ॥ १ ॥ रणवाद्यांचा रव ऐकोनी सुखशय्या सोडावी ॥ प्रियाकंठिंचा कर काढांनी चपला कटिची घ्यावी ॥ २ ॥ भाल फळांचा फराळ वरती तरवारीचे पाणी ॥ प्राशन करुनी रिपु माराया सज्ज अशी तब करणी ॥ ३॥ मदोन्मत्त शत्रूस मर्दुनी शिरकमलांची पूजा | मायभूमिच्या चरणीं बांधी हा दख्खनचा राजा ॥ ४ ॥ विसरलास का शिकवण सारी समर्थ गुरुरायांची ॥ दास्यबद्ध महाराष्ट्रा मरतां मरतां मारायाची ॥ ५ ॥ भला बुरा तूं बखत पाहुनी डावपेच लढवावे ॥ परी शेवटीं सुयश आपल्या पदरीं पाडुनि ध्यावे ॥ ६ ॥