पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. छाया. केव्हां मौन धरूनियां बसतसे, केव्हां मुखें चावळे केव्हां दृष्टि विशून्य सृष्टविषयी प्रेरूनियां बावरे। केव्हां श्वास सुदीर्घ घेई, अणुही केव्हां धरीना धृती वैदेहीविरहें व्यथाकुल असा तो होय लंकापती ॥ १७ ॥ मूल. उदितं मण्डलमिन्दोरुदितं सद्यो वियोगिवर्गेण । मुदितं च सकलललनाचूणामणिशासनेन मदनेन ॥४८॥ छाया. इन्टुमण्डल उगवलें, विरहिलोक करूं सहसा लागले फार शोक । शिरोरत्नचि मानिती यन्नियोग सकललेलना, तो हर्षला अनंग ॥ ४८ ॥ मूल. इदमप्रतिमं पश्य सरः सरसिजै वृतम् । सखे मा जल्प नारीणां नयनानि दहन्ति माम् ॥४९ ॥ छाया. बघ हे अनुपम रम्य सरोवर हसति यांत कमलॉली। नको गोष्ट ही सखया; रमणीनयनवृंद मज जाळी ! ॥४९॥

  • यांना 'जो ' ( लंकापति ) हा कर्ता. १अगदी विषयरहित. २ फार मोठा. ३ धैर्य. ४ जानकीच्या विरहानें. ५ जगत्प्रसिद्ध. ६ रावण. ७ चंद्रबिंब. ८ आपल्या प्रियजनापासून दूर असलेले लोक. 'विरहि लोक सहसा (एकाएकी) फार शोक करूं लागले'असा अन्वय. ९ मस्तकावरील उत्कृष्ट भूषण. १० ज्या-(अनंगा-ची आज्ञा. १२ सगळ्या स्त्रिया. १२ मटन 'सकलललना यान्नियोग शिरोरत्नचि मानिती तो अनंग हर्षला' असा अन्वय. १३ प्रफुल्लित होतात. १४ कमलपंक्ति. १५ स्त्रियांचा नयनसमाह