पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. हृदयावरि लावि शैवलातें भंवैती चाळवि सुंदरी तेनूतें। प्रियनाम सखीखांत येई तइं तदृष्टि नितांत दीन होई ! ॥ १९ ॥ मूल. इत एव निजालयं गताया वनिताया गुरुभिः समावृतायाः। परिवर्तितकन्धरं नतभ्रु स्मयमानं वदनाम्बुजं स्मरामि ॥२०॥ छाया. हरिणनयना इथुनीच गृहा गेली भोवताली गुरुजनीं वेष्टिलेली । मान मुरडे, भृकुटीहि नम्र होई असें स्मितयुत तद्दन मनीं येई ॥ २० ॥ मूल. कथय कथमिवाशा जायतां जीविते मे मलयभुजगवान्ता वान्ति वाताः कृतान्ताः। अयमपि खलु गुञ्जन् मञ्जु माकन्दमौली चुलुकयति मदीयां चेतनां चञ्चरीकः ॥२१॥ १ शेवाळें. २ इकडे तिकडे. ३ टाकी. ४ प्रिया. ५ अंगाला.६ पतीचे नांव. ७ मैत्रिणीच्या तोंडांत. ८ सुंदरीची दृष्टि. ९ अत्यंत. १० मृगाक्षी, प्रिया. ११ वडील माणसांनी. १२ भिवई. १३ मंदहास्ययुक्त, २४ त्या प्रियेचे मुख. १५ मनांत येते.