पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. तव जीवित जाइल प्रयाणे कोना न कळे तोषसि तूं, प्रिये ! कशानें ! ॥ १५ ॥ मूल. अकरुण मृषाभाषासिन्धो विमुश्च ममाञ्चलं तव परिचितः स्नेहः सम्यङ् मयेत्यभिधायिनीम् । अविरलगलद्वाष्पां तन्वीं निरस्तविभूषणां क इव भवती भद्रे निद्रे विना विनिवेदयेत् ॥१६॥ TET छाया. या करुणाहीना ! महोवंचका! यजि अंचल मम, कान्ता ! प्रेमाची तव ओळख पटली फार चांगली आतां ॥ ऐसें बोलुनि खळखळ पाणी नयनांतुनि जी ढाळी सुकोनि गेली, अलंकारही नचि अंगावरि घाली ॥ अशी असे मम दैयिता प्रियकर पंचप्राणांहून सखये निद्रे! तुजविण तिजशी संगम घडविल कोण ? ॥१६॥ तीरे तरुण्या वदनं सहासं नीरे सरोजं च मिलविकासम् । आलोक्य धावत्युभयत्र मुग्धा मरन्दलुब्धालिकिशोरमाला ॥१७॥ १ (माझ्या ) दूर जाण्याने किंवा वियोगानें. २ संतुष्ट होशील. ३ कोणत्या उपायानें. ४ निष्करुणा, निर्दया. ५ महान कपट्या. ६ सोड, ७ पदर. ८ प्रिया. ९ आवडती. १० भेट. ME E TTER