पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. ४७ __ छाया. ससीसमाजांत विहाररंगी आलाप माझे वदतां वरांगी। ऐकोनियां सन्निध शब्द माझा विद्युल्लतेच्या धीर थोर तेजाँ ॥ ९ ॥ मूल. मुधैव मन्तुं परिकल्प्य गन्तुं मृषैव रोषादुपजल्पतो मे। उदश्रुचञ्चन्नयनं नताशी गिरं न कां कामुररीचकार ॥१०॥ छाया. ' हा चाललों इथुनि भामिनि ! अन्यधामी। दावोनि कोप लटिका वदतों असें मी । तों आणुनी उदक कंपित लोचनांला ती काय काय वचने वदली न बाला ? ॥ १० ॥ तदवधि कुशली पुराणशास्त्रस्मृतिशतचारुविचारजो विवेकः । यवधि न पदं दधाति चित्ते हरिणकिशोरदृशो दृशो विलासः ॥११॥ १ मैत्रिणींच्या मंडळींत. २ क्रीडेच्या भरांत. ३ भाषण, शब्द. ४ बोलत असतां. ५ सुंदरांगी; सुंदरी. ६ विजेच्या. ७ कांतीला. विद्युल्लतेच्या थोर तेजा धरि' असा अन्वय. ८ दुसरीकडे. ९ इतक्यांत. असें मी वदतों तों इ. अन्वय. १० अश्रु, आसवें. ११ कंपयुक्त. १२ 'ती बाला काय काय वचनें न वदली!' असा अन्वय.