पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. दरदलदरविन्दसुन्दरं हा हरिणदृशो नयनं न विस्मरामि ॥७॥ छाया. फेकितांना मजवरी कटाक्षांस होय गुरुजनसंकोच यन्मनास। मृगाक्षीचे त्या नयन विस्मरे ना असे ईषत्फुल्लाब्जसाम्य ज्यांना ॥ ७ ॥ मूल. कपोलपालिं तव तन्वि मन्ये लावणधन्ये दिशमुत्तराख्याम् । विभाति यस्यां ललितालकायां मनोहरा वैश्रवणस्य लक्ष्मीः ॥८॥ छाया. कपोल्पाली तँन्वि ! तुझी ही उत्तरदिशाचि वाटे मुंदरीलका असुनि तिच्यामधिं वैश्रवणश्री थाटे ॥८॥ मूल. आलीषु केलीरभसेन बाला मुहुर्ममालापमुपालपन्ती। आरादुपाकर्ण्य गिरं मदीयां सौदामिनीयां सुषमामयासीत् ।। ९॥ १ वडील माणसांची लाज.२ जिच्या मनाला. ३ विसरत नाही. ह्याचे 'नयन' हे कर्म आणि 'मी' हा अध्याहृत कर्ता. ४ किंचित् फुललेल्या कमळाची शोभा. ५ ज्या नयनांना. ६. गंडप्रदेश, गाल. ७ हे कृशानि! ८ मुंदर केश कुटिल (लोंबत) आहेत जिच्यावर अशी; पक्षी सुंदर अलकानगरी आहे जिच्यांत अशी, ९ वैखरोखर, श्रवणश्री-कर्णशोभा; पक्षी कुबेराची लक्ष्मी.