पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. यो देहमर्पयति चान्यसुखस्य हेतोस्तस्मै वदान्यगुरवे तरवे नमोऽस्तु ॥ ८९॥ छाया. पत्रप्रसूनफलभारशिरी धरीशी शीतातपादिकहि संतत सोशितोसी। तूं वेंचिशी परसुखार्थ निजा तनही वृक्षा उदारतिलका ! प्रगती तुला ही ! ॥ ८९ ॥ मूल. हालाहलं खलु पिपासति कौतुकेन कालानलं परिचुचुंबिषति प्रकामम् । व्यालाधिपं च यतते परिरब्धुमद्धा यो दुर्जनं वशयितुं तनुते मनीषाम् ॥ ९०॥ छायाइच्छा करी प्रलँयपावकचुंबनाची वांच्छा धरी खचित चित्ति हलाहलाची भेटावयासि करि यत्न भुजंगराया जो दुर्जनासि वश इच्छितसे कराया ।। ९० ॥ मूल. दीनानामिह परिहाय शुष्कसस्या न्यौदार्य प्रकटयतो महीधरेषु । १ पाने, फुलें आणि फळे यांचे ओझें. २ थंडी, ऊन वगैरे. ३ अर्पण करितोस; खर्च करितोस. ४ आपली. ५ उदार जनामध्ये श्रेष्ठा. ६ नमस्कार. ७ प्रलयकाळच्या अग्नीला आलिंगन देण्याची. ८ हालाहल विष पिण्याची. ९ सर्पश्रेष्ठ तक्षकाला (भेटावयासी). १० वश कराया इ. अन्वय.