पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. अहो ! वारंवार स्वभुजबलदास मिरवी पुढे गीर्वाणांच्या, त्रिपुरमथनी बाण चढवी । अशा त्या कामाची तनु सुरवधूवंद्य सर्रसा हँराक्षिज्वालेने कवळिलि, अहा! आज, सहसा! ॥७९॥ मूल. युक्तं सभायां खलु मर्कटानां शाखास्तरूणां मृदुलासनानि । सुभाषितं चीत्कृतिरातिथेयी दन्तै नखात्रैश्च विपाटितानि ॥ ८॥ छाया. शाखा तरुंच्या मृदु उच्चं पीठे चीत्कार वक्तृत्व रसाळ मोटें । आतिथ्य लीली दर्शनादिकांच्या सभेत हे योग्यचि मर्कटांच्या ॥ ८॥ मूल. किं तीर्थ ? हरिपादपद्मभजनं, किं रत्नमच्छामतिः किं शास्त्रं श्रवणेन यस्य गलति द्वैतान्धकारोदयः। किं मित्रं सततोपकाररसिकं तत्वावबोधः सखे कः शत्रु वंद खेदानकुशलो दुर्वासनासंचयः॥८॥ १ आपल्या हातांच्या बळाची प्रौढी. २ समोर.३ देवांच्या. ४ त्रिपुराला मारणारा जो शिव त्याच्यावर. ५ सुरांगनांना वंदनीय. ६ सुंदर.७ शिवाच्या (तिसऱ्या डोळ्यांतील अग्निज्वालेने. ८ खांद्या. ९ उंच. १० आसने. ११ चीची असा शब्द. १२ पाहुणचार. १३ चेष्टा. २४ दांत व नखे यांच्या.