पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. < जगन्नाथरायपंडित या कवीचें नांव ठाऊक नाही असा संस्कृतज्ञ मनुष्य विरळा. त्याने रचिलेला भामिनीविलासनामक सुंदर आणि विद्वन्मान्य ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. प्रस्तुत पुस्तक हैं त्याचे मराठी पद्यात्मक भाषान्ता आहे; ह्मणून त्याला महाराष्ट्र भामिनीविलास हे नांव दिले आहे. जगन्नाथाच्या कित्येक ग्रंथांत त्याने आपणाविषयी कोठे कोठे उल्लेख केला आहे त्यावरून त्याच्यातंबंधानें थोडीशी विश्वसनीय माहिती उपलब्ध होते. ती अशी: जगन्नाथ हा तैलंगकुलोत्पन्न बाह्मण होय. याच्या वडिलांचें नांव पेरुभेट्ट असें होतें. यांना पेरमभट्ट असेंही मगत. हे मोठे पण्डित होते. यांनी काशीमध्ये अध्ययन केलें. हे ज्ञानेन्द्रस्वामीजवळ वेदान्त शिकले; महेन्द्रपण्डितांपासून यांनी न्यायवैशेषिकदर्शने संपादन केली; खण्डदेवांनी यांच्यावर पूर्वमीमांसेचा अनुग्रह केला; आणि शेषोपनामक पंडितांनी त्यांस महाभाष्य सांगितले. र तैलंगान्वयमङ्गलालयमहालक्ष्मीदयालालितः । ( प्रागाभरण ); तैलंङ्गकुलावतंसेन पंडितजगन्नाथनासफविलासाख्येयमाख्यायिका निरमीयत । सेयमनुग्रहेण सहृदयानामनुदिनमुल्लासिता भवतात (आसफविलास ). २ पाषाणादपि पीयूषं स्यन्दते यस्य लीलया ॥ तं वन्दे पेरुभट्टाख्यं लक्ष्मीकान्तं महागुरुम् ॥ (रसगंगाधर ). ३ श्रीमत्पेरमभट्टसू नुरनिशं विद्दल्ललाटंतपः। (प्राणाभरण ). ४ अध्यगीष्ट स्मरहरनगरे (रसगंगाधर ). ५ श्रीमज्ज्ञोनन्द्रीभोरधिगतसकलब्रह्मविद्याप्रपञ्चः। ( रसगंगाधर ). ६ काणादीरक्षपादीरपि गहनगिरो यो महेन्द्रादवेदीत् । (रसगंगाधर ). ७ देवादेवाध्यगीष्ट स्मरहरनगरे शासनं जैमिनीयम् । ( रसगंगाधर ). ८ शेषाङ्कप्राप्तशेषामलभणितिरभूत् । ( रसगंगाधर ).