पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंगल. विधिचिया नियमा अवमानिते सहृदयान्तरिं मोदचि निर्मिते । नवरसी नटली रुचिराहती जनिं अशी मिरवे कविभारती ! ॥१॥ - साधुवन्दन. पराचे साधाया हित निजहितातें दबडिती अभेदाची दृष्टी धरुनि सकलां तुल्य गणिती ! स्वभावें औदार्यप्रभृति गुण ज्यांचे विकसती विभूती त्या, लोकी अतुल निजतेजें विलसती ॥२॥ जगन्नाथप्रशंसा. जयाचे आलाप श्रवणिं पडतां फार मधुर न वाग्देवी प्रेमें फिरवि निजवीणेवरि कर । कवीन्द्राच्या ऐशा ललितवचनांनी न डुलती जनां त्या मानावें मनुजपशु किंवा पशुपति ॥३॥ गुरुनामादिसंकीर्तन व अर्पण. ज्याचा तात असे गणेश सुकृती, माता यशोदा सती हलेले हे कुल, नाम लक्ष्मण, जनस्थानी जयाची स्थिती। त्याने पद्यमयी नवीन रचिली भामाविलासावरी 2 छाया प्रारूत; ती करो सहृदयस्वान्तातपातें दुरी ॥४॥