पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योकिविलास मूल. स्थितिं नो रे दध्याःक्षणमपि मदान्धेक्षण सखे गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि । असौ कुंभिभ्रान्त्या खरनखरविद्रावितमहागुरुग्रावग्रामः स्वपिति गिरिगर्भे हरिपतिः ॥ ५० ॥ छाया. गजेन्द्रा ! सोडोनी निबिड वन हे जा, पळ कसा न जीवाचा येथें क्षणभरि मदान्धा ! भवता । कैरी मानोनीयां प्रखरनखरी खण्डित करी शिलासंघा, तो हा मृगपति निजे शैलकुँहरी ॥ ५० ॥ मूल. गिरिगव्हरेषु गुरुगर्वगुंफितः गजराजपोत न कदापि संचरेः । यदि बुध्यते हरिशिशुस्तनन्धयः भविता करेणुपरिशेषिता मही ॥५१॥ छाया. गजराजबाळ, न फिरे गुहान्तरी गिरिच्या, धरोनि गुरुंग अन्तरी । स्तनपायि बौल हरिची उठे" जरी करिणीच राहतिल शेष भूवरी ।। ५१ ।। १ गजश्रेष्ठा. २ दाट, गर्द. ३ हत्ती. ४ समजून. ५ तीत्र नखांनी. ६ पाषाणांच्या समुदायाला. ७ पर्वताच्या गुहेत. ८ अगा गजेंटाच्या बाळका. ९ गुहांमध्ये. १० मोठा अभिमान. ११ मनांत. १२ आईच्या अंगावरले दूध पिणारा. १३ बच्चा. २४ सिंहाचा १५ जर झोपेतून जागा झाला. १६ वाकी, शिल्लक.