पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. छाया. मूल स्थूल मुबद्ध, पुष्ट शतशा शाखा, महादिपा ! दुर्गी भूधरि वास, भीति कुठुनी आहे तुला सांग पा ?। ज्वालादारुण, सर्वभक्षक असा हा क्रूर दावानल थोडासा परि माझिया उपजवी चित्तांत चिन्तोज्वर ।।२।। मूल. ग्रीष्मे ग्रीष्मतरैः करैर्दिनकृता दग्धोऽपि यश्चातकस्त्वां ध्यायन घन वासरान् कथमपि द्राधीयसो नीतवान् । दैवाल्लोचनगोचरेण भवता तस्मिन्निदानीं यदि स्वीचक्रे करकानिपातनकृपा तत् कंप्रति ब्रूमहे ॥३३॥ छाया. गेलें होरपळोनि अंग रविच्या ताऐं निदाघीं, तरी ध्याँऊनी तुज, अब्दसे दिन, घना, जो कंठि कैसे तरी । दैवें दृष्टि पडोनि वृष्टि करिशी त्या चातकाच्या वरी गारांची, करुणाकरा जलधरा ! हा बोल कोणा तरी ॥ ३३ ॥ in मूल. दवदहनजटालज्वालजालाहतानां परिगलितलतानां म्लायतां भूरुहाणां। अयि जलधर शैलश्रोणिशंगेषु तोयं वितरसि बहु कोऽयं श्रीमदस्तावकीनः॥ ३४ ॥ १ बुंधा. २ मोठा. ३ जमिनीत चांगला दृढ झालेला. ४ शेंकडों. ५ खांद्या. ६ मोठ्या वृक्षा. ७ चढण्यास कठीण अशा. हैं 'भूधार' याचे विशेषण. ८ डोंगरावर. ९ वस्ती. १० ज्वालांच्या योगानें भयंकर. ११ वणवा. १२ चिंतिरूप ताप. १३ उष्ण कालांत. १४ चिन्तन करून १५ वर्षासारखे.