पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास मृल. पत्रफलपुष्पलक्ष्म्या कदाप्यदृष्टं वृतं च खलु शूकैः उपसर्पम भवन्तं बर्बुर वद कस्य लोभेन ॥२२॥ छाया. नोहे फल, नोहे दल, नोहे सुम, बाभुळा ! भंवतिं कांटे वैभव तव हे पाहुनि लाज तुझ्या जवळिं यावया वाटे ।।२२॥ मूल. एकस्त्वं गहनेऽस्मिन् कोकिल न कलंकदाचिदपि कुर्याः साजात्यशंकयामी न त्वां निघ्नन्ति निर्दयाः काकाः॥२३॥ छाया. असहाय कोकिला तूं विपिनी या; कधिं इथें न करिं गान समजातीय समजुनी रक्षिति तव अदय काक हे प्राण !।।२।। मुल. तुरुकुलसुषमापहरां जनयन्तीं जगति जीवजातार्तिम् केन गुणेन भवानीतात हिमानीमिमां वहसि ॥ २४ ॥ छाया. तस्कुललक्ष्मी हरिते, सकलां जीवांस दुःख देते ही काय ह्मणोनि हिमानी धरिशि भवानीपित्या ! शिरावरि ही॥२४॥ मूल. कलभ तवान्तिकमागतमलिमेन मा कदाप्यवज्ञासीः अपि दानसुन्दराणां द्विपधुर्याणामयं शिरोधार्यः॥२५॥ १ अगा बाभळीच्या झाडा ! २ एकटा. ३ आपल्या जातीचा. ४ झाडांच्या समुदायाची शोभा. ५ सुद्धा, तसेंच. ६ बर्फाची रास. ७ अगा हिमालया