पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. - कवि आहांत, या कन्येवर श्लोक करावा, पंडिताने ताबडतोब असा श्लोक रचलाः 'यं मुस्तनी मस्तकन्यस्तकुंभी कुमुंभारुणं चारु चेलं दधाना । समस्तस्य लोकस्य चेतःप्रवृत्ति गृहीत्वा घटे स्थाप्य यातीव भाति ! ।' ‘बादशाहानें तो श्लोक ऐकतांच एवढ्या थोड्या वेळांत श्लोक केला ह्मणून त्याची मी फारच प्रसन्न झाली. तेव्हा पंडिताला सांगितले, की तुझ्या इच्छेस येईल ते माग. तेव्हां पंडित बोलले: 'न याचे गजालिं न वा वाजिराजि न वित्तेषु चित्तं मदीयं कदाचित् । इयं मुस्तनी मस्तकन्यस्तकुंभा लवंगी कुरंगीदृगंगीकरोतु ॥' हैं मागणे ऐकतांच बादशाहा अंतःकरणांत खिन्न झाला. परंतु वचन गेले त्यामुळे कंठित झाला. नंतर पंडितास म्हणाला तूं आमच्याबरोबर खाना खाशील तर आम्ही तुला आपली "मुलगी देऊ. पंडितांनी ती गोष्ट कबूल केली; आणि आपले बाम्हण्य नष्ट झाले तरी चिंता नाही परंतु राजकन्या प्राप्त होवो असा निश्चय केला.' "जरी राणीच्या मनांत आपल्या कन्येचें त्याच्याशी लग्न लावू नये असे आले तरी तिची इच्छा पूर्ण केली तरच ती जगणार, अन्यथा प्राणत्याग करील, असें पाहन तिने एके दिवशी राजाची प्रसन्न मर्जी पाहून त्याजजवळ ही गोष्ट काढण्याचा विचार केला. 15EPH