पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट तिसरें.. १४९ पराभव करीन. नंतर त्याने त्याच काजीजवळ जाऊन यवनधर्मातले सगळे ग्रंथ पाहिले आणि त्या शास्त्राचे त्यास मार्मिक ज्ञान झाले. तेव्हां कोटिक्रमाने त्या काजीशी धर्मविषयक वाद करून त्यास कंठित केले आणि स्थापिलें की, यवनांचा धर्म तो यवनांनीच आचरावा, दुसऱ्यास आधिकार नाही. तेणेंकरून बादशाहाची मर्जी फार प्रसन्न झाली आणि त्याने पंडिताला आपले पदरी वाळगिलें. फारशी भाषा शिकल्यानंतर मनोरंजनार्थ पंडितांनी संस्कृत श्लोक, फारशी शायरी असे मिश्रभाषात्मक कित्येक रचिले. बादशाहाच्या दरबारी जगन्नाथरायपंडितापेक्षां कोणी वरिष्ठ नव्हता. पुढे त्याची विद्याकीर्ति सर्वत्र पसरली.' 'जगन्नाथरायपंडित स्वरूपाने फार सुंदर देखणा पुरुष होता; आणि विषयासक्त फार असे. ही गोष्ट राजकन्येच्या कानावर गेली. आणि तिला त्याच्या बुद्धीचा व सौंदर्याचा अभिनव चमत्कार वाटून ती आपल्या महालांत बसून जाळीच्या पडद्यांतून वारंवार त्याच्याकडे पहात असे. त्या कन्येचे वय सोळा वर्षांचे झाले असतां जगन्नाथपंडिताबरोबर लग्न करावे असा तिने निश्चय करून आपले मनोगत आईला सांगितले. या नामांकित राजकन्येचें नांव लवंगी. ती फारच रूपवती आणि गुणवती होती. एके दिवशी जगन्नाथरायपंडित बादशाहाबरोबर बुद्धिबळे खेळत असतां बादशाहाला तहान लागली; तेव्हां राजकन्या लवंगी मुवर्णकलश डोक्यावर घेऊन राजाकडे आली. राजा पाणी प्याल्यानंतर ती आली तशी मस्तकावर सुवर्णकलश घेऊन परत जाऊ लागली, तेव्हां राजानें पंडितांस हटले की, तुझी