पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट तिसरें. १५१ . तो इतक्यांत राजानेच येऊन राणीला ते वृत्त कळविले. नंतर बादशाहाने त्या दोघांचे लग्न मोठ्या समारंभाने लाविलें; आणि त्यानंतर लोकांनी जगन्नाथपंडिताला जातीबाहेर टाकिलें, तरी राजाश्रयामुळे ती उभयतां मुखाने नांदली. या गोष्टीला बहुत वर्षे लोटल्यानंतर पंडितराय हे वैराग्य पावून त्या यवनीसहवर्तमान काशीस जाऊन राहिले. ' एके दिवशी जगन्नाथपंडित यवनीसहवर्तमान भागीरथीच्या काठी निजले होते; तो प्रहर दिवस आला तरी जागृत झाले नाहीत. त्या वेळेस त्या मार्गानें अप्पया दीक्षित जात होते. त्यांनी पाहून मटलें, असल्या प्रसिद्ध ठिकाणी कोण चाण्डाल यवनीला घेऊन निजला आहे ? जवळ जाऊन पाहतात तो त्याच्या डोकीचे केस पिकले होते. तेव्हां दीक्षितांनी अर्ध श्लोक ह्मटलाः 'किं निःशंकं शेषे शेषे वयसि त्वमागतो मृत्युः। 'नेव्हां जगन्नाथपंडिताने तोंडावरचे पांघरूण काढिले असता दीक्षितांनी त्यास झटले की,- महा DAY' अथवा सुखं शयीथा निकटे जागर्ति जान्हवी भवतः। 'जगन्नाथपंडित काशीस जाऊन राहिले तेव्हां त्यांना शद्ध करून घेण्याविषयी तेथील विद्वानांच्या मनात होते. परंतु पंडितांचें झणणे असे होते की माझ्या यवनीमुद्धां मला शुद्ध करून घ्याल तर मी प्रायश्चित्त घेईन; परंतु ती गोष्ट घडावयाची नाहीं ह्मणन तो विचार तसाच राहिला. पंडितरायाने अंतर्यामी पत्र्यात्ताप पावून भागीरथीवर पूर्ण भाव ठेविला होता. ही गोष्ट पुढे सर्व लोकांच्या प्रत्ययास आली. शके १५०० मध्ये एके दिवशी