पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट तिसरें. 'जगन्नाथराय पडित, 11' हा कवि तैलंगण देशांत मुंगंडा म्हणून एक शहर आहे तेथील राहणारा असे. वेगीनाड कुळांतील रामचंद्र उपाध्याय नामक ब्राम्हणाचा हा मुलगा होय. तो अकबर बादशहाच्या वेळी होता. जगन्नाथ हा बारा वर्षांचा होईपर्यंत त्याला संस्कृत भाषेचा एक शब्दही ठाऊक नव्हता. नंतर आपल्या मेहण्याच्या घरी राहून त्याने काव्याभ्यास केला. रात्रंदिवस श्रम करून त्याने गीर्वाण भाषेचे चांगले ज्ञान संपादन केले. तदनंतर न्याय, अलंकार, मीमांसा इ० शास्त्रे पढ़न तो मोठा बुद्धिमान् कवि झाला. नंतर तो कर्नाटक देशाच्या राजाच्या भेटीस गेला, परंतु तेथें त्याच्या इच्छेप्रमाणे गुणांची चहा न झाल्यामुळे जो अपमान झाला तरोधक काही लोक रचावे ह्मणजे त्याचे लक्ष लागेल म्हणून त्याने काही श्लोक रचले. अशी युक्ति केली, तथापि त्याच्या श्रमाकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यानंतर जगन्नाथपंडित तेथून निघून जयपुरास गेला आणि तेथें बहुत वर्षे राहून अनेक प्रकारच्या शास्त्रविषयांमध्ये पंडितांस त्याने जिंकले आणि तेथे मोठी शाळा घालून शेंकडों विद्यार्थ्यांस शाखें पुराणे इत्यादि पढविली.' 'दिल्लीस बादशहाच्या पदरी एक महान् विद्वान् काजी होता. त्याने आपल्या विद्येच्या बळाने ' यवन धर्म खरा ' असें स्थापण्याच्या उद्देशाने देशोदेशी जाऊन कित्येक पंडितांस कुंठित केले; तेव्हां त्यांस मोठी चिंता पडली. जगन्नाथरायपंडिताने सांगितले की, एक वर्षाची मुदत द्याल तर मी त्या काजीचा