पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ महाराष्ट्र भामिनीविलास. विचार करू लागले. परंतु त्याला काही उपाय सुचेना. तेव्हां तें शिवपूजकांना त्रास देऊ लागले. असा प्रतिपक्षसंवन्धिजनाचा तिरस्कार वर्णित झाला ह्मणून प्रत्यनीक अलंकार. 'रे रे ' या द्विरुक्तीने अत्यंत तिरस्कार व्यंजित झाला. परमेश्वराकडे मनाची प्रेरणा करूं लागल्यास विषयान्तरासक्तीने ते तिथे स्थिर होत नाही हा भाव. वसंततिलक. २२. सादृश्यमूलक रामविषयक संशय वर्णिले म्हणून ससं. देहालंकार. पुष्पिताग्रावृत्त. छेकानुप्रास. २३. वरचाच अलंकार. पण येथें तो निश्चयगर्भ आहे. वृत्त्या नुप्रास, छेकानुप्रास आणि यमक. हरिणीवृत्त. २४. येथें ससंदेहालंकारच. परंतु तो निर्णयांत परिणत झाला आहे ह्मणून निश्चयान्त संदेह. छेकानुप्रास. शिखरिणी. २५. नीचगृहादिक आणि लक्ष्म्यादिक यांचा अननुरूप संबंध वर्णन केला ह्मणून विषमालंकार. मी दीन कोणीकडे आणि तूं ईश्वर कोणीकडे असा अर्थ आक्षिप्त झाल्यामुळे विषमालंकारध्वनि. ईश्वराच्या विषमतेविषयी असहिष्णुत्व हे व्यंग्य. शार्दूलविक्रीडित. धर्मवीर रस. २६. अनन्यसाधारणकवित्व सूचित करणारा जो गर्व तन्मूलक वीररसाचा ध्वनि या पद्यांत आहे. छेकानप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. २७. कवीन्द्राच्या वाणीपुढे वीणानाद फिका वाटू लागला हा अर्थ प्रतीत झाल्यामुळे व्यतिरेकध्वनि. पाण्डित्यवीर. छेकानुप्रास. शिखरिणी.