पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १४५ १३. इंदिरेशादिकांचेंच भजनादिक करावें अन्याचें करूं नये असा अर्थ तात्पर्यमर्यादेनें प्रतीत होतो म्हणून परिसंख्या; यमकालंकारही. मालिनी. शान्त रस. FORIA १४. सावयवरूपकालंकार. शिखरिणी. छेकानुप्रास. १५. मुक्तीसाठी कर्मपाश तयार करणे हैं इष्टार्थाच्या प्राप्तीला विपरीत आचरण झाले म्हणून विचित्रालंकार. ज्ञानाने मोक्ष संपादन करणे हा उत्तम मार्ग हे व्यंग्य. मंदाक्रांता. छेकानुप्रास. अद्भुत रस. १६. विष्णु हे आधेय क्रमाने अनेकाधिकरणक झाले ह्मणून पर्याय अलंकार. छेकानुप्रास. शान्त रस. गीति. जाम १७. निराश होऊ नको हे व्यंग्य. गीति. १८. लक्ष्मी आपल्या अनेक विलोभनीय गुणांनी प्रसिद्ध असून तिचा मादकत्व या दोषामुळे तिरस्कार कथन केला ह्मणून तिरस्कार अलंकार. छेकानुप्रास. शान्त रस. शिखरिणी. १९. जननी भागीरथी उभी जवळ' हा अर्थ मनांत येऊन वक्त्याला पूर्वार्धगत स्वोक्तीचें वैफल्य वाटले ह्मणून तो तिचा निषेध करून ' अथवा सुखें निजावें ' असें बोलला; यास्तव आक्षेपालंकार. जननीपदाने परमकारुणिकत्व व्यंजित झालें. भागीरथीशब्दाने परमपावित्र्य ध्वनित झाले. उभी याने जागरूकत्व द्योतित झाले. जवळ एणेकरून एका क्षणांत पनीत होण्याचा संभव गम्यमान झाला. छेकानुप्रास. गीति. २०. वक्त्याचे परमेश्वरविषयकरतिमूलक धैर्य व्यंजित झालें. य मक, छेकानुप्रास. गीति. २१. मनाचा मुलगा तो मनोभव ( मदन ). त्याला शिवाने जाळून भस्म केले. यास्तव मन हे त्याचा सूद घेण्याविषयीं