पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ महाराष्ट्र भामिनीविलास. झाले. शेवटच्या चरणांत अनन्वयालंकार. करुण आणि शान्त रस. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ६. शार्दूलविक्रीडित. छेकानुप्रास. करुण रस. ७. व्यतिरेकालंकारध्वनि. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ८. एकच कृष्णाख्य वर्णद्वय विविधप्रकारें वर्णिलें ह्मणून उल्लेख. रूपकालंकार स्पष्टच आहे. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित, ९. 'त्याशी कधी सख्य न करी' हा निषेध बाधित होऊन अर्थान्तरावर पर्यवसित झाला असल्यामुळे आक्षेपालंकार. 'बाल, ' 'तमालसुंदर, ' वृन्दावन, ' ' गोवृन्द, ' 'सौन्दर्यामृतनिष्यन्दि मन्दस्मिते, ' आणि 'सर्वभंगुरवस्तुविनाशकत्व' यांनी बालमूर्ति गोपवेषधारी घनश्याम श्रीकृष्णाचा आक्षेप होतो. छेकानुप्रास. शान्त रस. शार्दूलविक्रीडित. १०. व्यतिरेक आणि परिकरांकुर अलंकार. करुण. मन्दाक्रांता वृत्त. ११. चातकाचा उपकर्ता मेघ आहे आणि नीलत्व, स्निग्धत्व, तापहारकत्व इत्यादि गुणांनी मेघाचे श्रीकृष्णाशी साम्य आहे त्यामुळे. मेघस्मरणानें तत्सदृश श्रीकृष्णाचे स्मरण होते ह्मणून स्मरणालंकार. पूर्वार्धगत अर्थाला उत्तरार्धगत अर्थ हेतुभूत आहे ह्मणून काव्यलिंग. मन्दाक्रान्ता वृत्त. शांत रस. छेकानुप्रास. १२. विष्णुप्राप्तिरूप इष्टार्थ स्वहृदयांत असतां तो कोठे आहे म्हणून पृच्छा करीत सुटणे हे इष्टार्थप्राप्तीला विपरीत असें आचरण झाले म्हणून विचित्रालंकार. छेकानुप्रास. शान्त व अद्भुत रस. मन्दाकान्ता.