पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १७. वृत्त्यनुप्रास. छेकानुप्रास. श्लेषालंकार. श्लेषाने देखील भामिनीविषयक परपुरुषगमन सुचविणे अगदी अनुचित होय असें रा० परांजपे यांच्याप्रमाणे आह्मांसही वाटते. १८. पहिल्या दोन चरणांनी पतिविषयक प्रेम अभिव्यक्त झाले. १९. वाक्चातुरी वगैरे प्रस्तुत पदार्थाचा गायनरूप सामान्यधर्मामध्ये एकेच काली अन्वय झाला ह्मणून तुल्ययोगिता. यमक. छेकानुप्रास. (शान्तविलास.) १. रूपक आणि उपमा. छेकानुप्रास. भयानक आणि शान्त हे रस. पृथ्वीवृत्त. 'अखिल इंदिरा (आणि ) माधुरी जयांत सदा वसती असा हरिमुखेंदु ते ( मन ) चकोरापरी चिर पिवो ' असा अन्वय. २. पहिल्या चरणांत रूपक; तिसन्यांत व्यतिरेक. छेकानुप्रास, वृत्त्यनुप्रासही. पृथ्वीवृत्त, करुण रस. ३. सामान्य घनमालेपेक्षां श्रीकृष्णरूप जी नीलघनावलि तिचा उत्कर्ष पहिल्या तीन चरणांत वर्णिला ह्मणून व्यतिरेक. छेकानुप्रास. पृथ्वी वृत्त. शांत रस.. ४. 'लता' शब्दाने गोपींचें, 'पथीं ' शब्दाने उत्तमाधमयोनिसंचरणाचें, आणि तमालाने भगवान् श्रीकृष्णाचें निगरण झाल्यामुळे सावयवातिशयोक्ति अलंकार झाला. छेकानुप्रास. वृत्त्यनुपासही. पृथ्वी वृत्त. शान्त रस. ५. पापाचा अभाव हे कारण नसतां प्रसादरूप कार्य झाले ह्मणून विभावना. यानें परमेश्वराचे अत्यंत कारुणिकत्व सूचित