पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. भामिनीच्या कृत्याचा अत्यद्भुतपणा ध्वनित केला. यमक. छेकानुप्रास. ६. श्लेषमूलक पूर्णोपमा. छेकानुप्रास. ७. भामिनीचा गर्मितव्यतिरेकानें पूर्वकालीन उत्कर्ष स्फुटित झाला. अधिपति अस्तंगत झाला ह्मणजे बाजारबुणग्यांचे साम्राज्य स्थापित होते हे व्यंग्य. छेकानुप्रास. यमक. ८. लुप्तोपमा आणि पूर्णोपमा. ९. मुक्ति या स्त्रीलिंगिपदसामर्थ्याने सखीगृहगमन सूचित झाले. 'पतिव्रता ' शब्दाने परिकरांकुर. यमक. १०. पूर्णोपमा आणि विनोक्तयलंकार. वृत्यनुप्रास, ११. पहिल्या अर्धात व्यतिरेक. छेकानुप्रास. सूर्य अस्ताला गेला ह्मणजे काजवे चमकू लागतात हे व्यंग्य. १२. रूपकालंकार. प्रस्तुत भामिनीरूप गृहदेवतेबरोबर विशेपणसामर्थ्याने अन्य इष्टदेवतेचा वृत्तांत मनांत येतो झणून समासोक्ति. छेकानुप्रास. १३. उपमालंकार. उत्तरार्धाने भामिनीरुत्याचे अत्यंत अनौचित्य व्यक्त झालें. १४. गुणांच्या आश्रयहीनत्वाने भामिनीचें अनन्यसाधारण गुणवत्व सुचविलें. छेकानुप्रास. १५. 'कनकाधिक कान्ति ' याने व्यतिरेक. दुसऱ्या चरणांत प्रतीप. पहिल्या अर्धात हेतु कल्पून तिसऱ्या चरणाने उत्प्रेक्षा व्यक्त केली. छेकानुप्रास. १६. चारी चरणांत चार उपमा आहेत. छेकानुप्रास. TEP