पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १४१ परकीय स्त्रीचा संवाद आहे. पांथरुत पहिल्या प्रशांत रुशत्वाचे कारण सांगशील तर मी तें दूर करीन असा आशय गर्भित आहे. याच्यावरील उत्तराने असे सुचविलें की, मी पतिव्रता आहे; परपुरुषाला कशत्वाचा हेतु सांगणे उचित नव्हे आणि त्याने त्याचा प्रतिकार करणेही शक्य नव्हे. द्वितीयार्धगत पांथरुत द्वितीयप्रश्राचा व्यंग्यार्थ असा की पातिव्रत्याच्या कसच्या गोष्टी सांगतेस, चैन करणें हेंच संसारसार आहे. याच्यावरील उत्तराने असें ध्वनित केलें की, जी माझी दशा तीच तुझ्या जायेचीही आहे, तिचा प्रतिकार कर झणजे पुरे; आपल्या घराला आग लागली असतां ते तसेंच सोडून दुसऱ्याच्या घराची आग विझविण्याला धांवणे हा कोण मूखपणा ! वृत्यनुप्रास. (करुणविलास.) १. करुणविलासांतील या आणि इतर सगळ्या पद्यांत विप्रलंभ शृंगार आहे. अठराव्या पद्याचे वृत्त औपच्छंदसिक आहे. बाकीच्या सर्व पद्यांचे वृत्त वसंततिलक आहे. छेकानुप्रास. २. नायिका आलंबनविभाव, अश्रुपातादिक अनुभाव, आवेग, विषाद वगैरे संचारिभाव यांनी नायकगतरति व्यंजित झाली. आत्ममूलक शोकाची ती येथें अंगभूत झाली आहे. छेकानुप्रास. ३. पूर्णोपमालंकार. छेकानुप्रास. ४. सदये ' या हेतुगर्भ विशेण्यपदसामर्थ्याने परिकरांकुर. छेकानुप्रास. ५. ' य' या पदाने शिलाशकलावर देखील चढण्याचे असामर्थ्य सुचविले. 'स्वर्ग ' आणि 'असहाय ' या पदांनी