पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० महाराष्ट्र भामिनीविलास. किंचित् विकास आणि किंचित् मुकुलीभाव ही द्योतित झाली. यमक. छेकानुप्रास. वसंततिलक. ६३. विद्रुमवल्लरी आणि पल्लव या उपमानपदांचा माधुर्यासंबंधाने तिरस्कार स्पष्ट झाला यास्तव प्रतीप. छेकानुप्रास. द्रुतविलंबित. ६४. खंजननयनलीला आणि सुंदरीनयनलीला या उपात्त अथार्चा उपमेंत पर्यवसित होणारा अभेद दर्शविला ह्मणून निदर्शना. उत्तरार्धात कमलाच्या अल्पकाळ टिकणाऱ्या लक्ष्मीनें सर्वदा सश्रीक दिसणाऱ्या वदनाचा उत्कर्ष वर्णिला ह्मणून व्यतिरेक. मालिनीवृत्त. यमक. छेकानुप्रास. ६५. रूपक स्पष्ट आहे. सीता आणि रामचंद्र यांनी परस्परहृदयप्रवेशनरूप व्यापार केला यास्तव अन्योन्यालंकार. छेका नुप्रास. मालभारिणी. ६६. प्रियेच्या सुवर्णागयष्टिरूप प्ररुतपदार्थाचा अप्ररुतकांचनराजीच्या उपन्यासाने तिरस्कार झाला ह्मणून प्रतीप. मालभारिणी. ६७. दंतांनी आपली नैसर्गिक धवलता टाकून आपल्याजवळ असणाऱ्या अधरोष्ठात्मक भिन्नवस्तूचा रक्तिमारूप गुण ग्रहण केला ह्मणून तद्गुण अलंकार. ६८. मुखाच्या नैसर्गिक रक्तपणामुळे तांबलाचा रक्तपणा तेथे ओळखतां येण्याला साधन नाहीं असें वर्णिलें ह्मणून मीलित अलंकार. शिवाय रूपक आणि प्रतीपही. छेकानुप्रास. साकी. ६९. यांत प्रभाला प्रतिबंधक असें गूढार्थज्ञानात्मक उत्तर आहे म्हणून उत्तरालंकार. या गीतीत कोणाएका पांथाचा आणि