पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १३९ ५५. मुखावर तत्सादृश्यास्तव कमल आणि मृगांक यांचा संशय उत्पन्न झाला म्हणून ससंदेहालंकार. छेकानुप्रास. साकी. ५६. ही दशनकांति नव्हे, तर केसर होत; हे अलक नव्हत तर अलि होत; या दोन अपहृतींनी तूं नारी नाहींस, तर कमलिनी आहेस ही तिसरी अपहृति व्यंजित झाली. यमक.छेकानुप्रास. पुष्पिताया वृत्त. ५७. पंकजा या उपमानापेक्षा आनना या उपमेयाचा उत्कर्ष वार्णला ह्मणून व्यातिरेक. मुखाचें सततोल्लसितत्व व निशेच्या ठायीं पंकजाची सौंदर्यहानि येणेकरून वरील व्यतिरेक स्पष्ट झाला. पंकजपदाने नैसर्गिक अधमता व्यंजित झाली आणि त्यामुळे परिकरांकुर. दिंडी. ५८. प्रिया सुमकांतिहरण कारते, आणि कुसुमबाण माझे प्राण घेतो, अशी कार्यकारणांची असंगति झाल्यामुळे असंगतिनामा अलंकार. पूर्वार्धात व्यातिरेकही. साकी. यमक. छेकानुप्रास. ५९. विरहव्यथेमुळे ब्रजांगनांना पूर्णिमा प्रळयकाळाच्या अग्नीप्रमाणे असह्य वाटली आणि सुंदर सोधप्रदेश समुद्रासारखे अफाट आणि शून्य वाटले असा विरुद्ध प्रकार वर्णिला ह्मणून विरोधालंकार. छेकानुप्रास. साकी. ६०. बाल्यासह गमनाचें मन्दत्व; चित्तासह अधरविंबाचें सुरक्तत्व; आणि मन्मथाबरोबर नितंबाचें असामान्य गुरुत्व असा चमत्कारिक सहभाव वर्णिला ह्मणून सहोक्ति. वसंततिलक. ६१. प्रथमाधावरून नायिकेचे मरण आक्षिप्त झाले. दिंडी. ६२. उपमालंकार. स्वेद आणि कंप ही सात्विकभावाची लक्षणे आहेत. प्रभातनलिन झटले यावरून नलिनाची कोमलता,