पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ महाराष्ट्र भामिनीविलास. रागाचा नाश किंवा त्याने अभिव्यक्त झालेला प्रसाद हा अनुभाव. उत्पत्तिकालींच रोषनाश हे व्यंग्य. घनपंक्तीचा उदय हे कारण असतां कोपत्यागरूप कार्य घडलें नाहीं असें झटले ह्मणून विशेषोक्ति. यमक. साकी. ५१. मुखरूप एकच वस्तु भुंग आणि चकोर यांस क्रमाने सरोज आणि सुधांशु एतद्रूप वाटली ह्मणून उल्लेखालंकार. छेकानुप्रास. वृत्त्यनुप्रास. वसंततिलक. 'सुधांशु' पदाने परिकरांकुरही. ५२. 'स्मित, ' 'मुख, ' 'कुचकल्पना, ' आणि 'रमणी' या प्रकृतपदार्थीचा निरनिराळ्या प्रकाराने निषेध करून 'नवविकास,' 'मुगंधि सुम, ' 'कनकवर्ण सत्फलें, ' आणि 'रुचिर वल्लरी,' या अप्रत अर्थीची क्रमाने सत्यतापूर्वक सिद्धि केली ह्मणून अपहृति. छेकानुप्रास. पृथ्वी. ५३. चंद्रोदयाने संतप्त झालेल्या विरहिनायकाला शशांक हा तत्सदृशतेमुळे नीलरंध्रयुक्त सूर्य आहे अशी भ्रान्ति झाली म्हणून भ्रांतिमदलंकार. संग्रामांत जे योद्धे मरून पडतात ते सूर्यमंडलभेद करून मुक्ति पावतात अशी उक्ति आहे. (द्वाविमौ पुरुषो लोके सूर्यमंडलभेदिनौ । परिवाइ योगयुक्तव्य रणेचाभिमुखो हतः ॥ ) मंडलभेदामुळे सूर्याला सच्छिद्रता आली आणि ती शशांकसादृश्याला उपयोगी पडली. 'वरती स्वरूपाप्रती जाती' म्हणजे सूर्यमंडल भेदून मुक्त होतात. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ५४. सित आणि रुष्ण या प्ररुत दृष्टिस्वरूपाचा निषेध करून अप्ररुत 'पीयूष ' आणि 'विष' यांची अनुक्रमें सत्यतेने सिद्धि केली म्हणून अपहृति. छेकानुप्रास. वसंततिलक.